लोकसंदेश न्यूज जत प्रतिनिधी: नितीन बदडे
डॉ पवार कुटुंबियांचे सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव....
.... काही माणसांचे जीवन हे आनंदयात्रा असते काहींचे जीवन ही संघर्षाची मालिका असते या संघर्ष मालिकेतही आपल्या कर्तुत्वाचे तेजस्वी दिप तेवत ठेवण्याचे भाग्य काहींना लागते . त्यामध्ये डॉ सी.बी. पवार यांचा समावेश होतो .
आपल्या जत तालुक्यातील पूर्व भागातील उटगी या छोट्याशा खेडेगावात गरीब कुटुंबात डॉ सी बी पवार साहेबांचा जन्म झाला तेथेच प्राथमिक शिक्षण घेऊन, उमदी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी सोलापूर येथे आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले याच काळात त्यांनी शासकीय नोकरीमध्ये सहभाग होऊन जास्तीत जास्त त्यांनी सावंतवाडी व जत येथे ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्र शासन या ठिकाणी आपली नोकरी करीत करीत प्रथमतः जत येथे श्री गलगली यांचे इमारतीमध्ये माडीवर आपले पहिले स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले त्यानंतर त्यांनी पुढे आपल्याच वास्तूमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये व्यवसाय सुरू ठेवला .याच काळात जत येथे वैद्यकीय सेवा करीत असता त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत राहावे लागले व शासकीय सेवेच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जत मध्येच आपला वैद्यकीय व्यवसाय सेवाभावी वृत्तीने उत्तम प्रकारे करीत आहेत.
हा जरी साहेबांचा जीवनक्रम झाला तरी त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे पूर्णपणे लक्ष देऊन त्यांचेही शिक्षण पूर्ण केले .
यामध्ये त्यांची जेष्ठ सुकन्या डॉक्टर कोमलताई या कॉर्ड्यालोजीस्ट असून मुंबईमध्ये त्या एस .आर . हॉस्पिटल आणि सोमैया हॉस्पिटल मधे वैद्यकीय सेवा पुरवत आहेत .
तसेच साहेबांची दुसरी कन्या डॉक्टर शितलताई ह्या डीएनबी क्रिटिकल केर मेडिसिन फिजिशियन असून त्यांनीही यातील इंटरनॅशनल डिग्री उत्तीर्ण होऊन सध्या त्या रुबी हॉस्पिटल पुणे येथे icu विभागात प्रमुख म्हणून कार्यरत आहेत .
साहेबांचे छोटे चिरंजीव डॉक्टर वैभव यांनी देखील एमडी मेडिसिन हा अभ्यासक्रम पूर्ण करून आता ते त्यातील सुपर स्पेशालिटी पूर्ण करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम करीत आहेत.
या कुटुंबाचे आपण हे यश पाहिले तर आपणास देखील खूप खूप अभिमान वाटतो
या यशाचे रहस्य म्हणजे
या मुलांचे मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना यशाकडे झेप घेण्यासाठी त्यांच्या मातोश्री सौ .अनिताताई यांचा सिंहाचा वाटा आहे यात शंकाच नाही .
या सर्व मुलांना याप्रमाणे शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व त्यांना मार्गदर्शन त्यांचे पिताश्री व आपल्या सर्वांचे आवडते डॉक्टर
सीबी पवार साहेब यांनी व सौ वहिनीसाहेब यांनी खूप मोठे श्रम घेतले
तसेच या या श्रमाला परिपूर्णता येण्यासाठी त्यांच्या या भाग्यवान मुला-मुलींनी देखील खूप कष्ट घेऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण केला हे आपणा सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप अभिमानाची गोष्ट आहे . *आई दिव्याची ज्योत असते आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा बाप असतो .* ही काव्यपंक्ती पवार कुंटुबिया कडे पाहून येते .आज झालेल्या या कार्यक्रमात संपूर्ण पवार डॉक्टर कुटुंबियांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुवर्यांचा सत्कार करण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.