.आण्णासाहेब लठ्ठे यांच्या सत्यशोधक चळवळीमधील कार्यावर संशोधन होण्याची गरज : प्रा. महावीर मुळे* *सभेच्यावतीने दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांची 74 वी पुण्यतिथी साजरी*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

.आण्णासाहेब लठ्ठे यांच्या सत्यशोधक चळवळीमधील कार्यावर संशोधन होण्याची गरज : प्रा. महावीर मुळे* *सभेच्यावतीने दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांची 74 वी पुण्यतिथी साजरी*



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

*स्व.आण्णासाहेब लठ्ठे यांच्या सत्यशोधक चळवळीमधील कार्यावर संशोधन होण्याची गरज : प्रा. महावीर मुळे*
*सभेच्यावतीने दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांची 74 वी पुण्यतिथी साजरी*

*सांगली - दि.16* : तत्कालीन मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री, सत्यशोधक चळवळ, छ. शाहु महाराज, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी असलेले त्यांचे संबंध  अशा सामाजिक कार्यावर अधिक व्यापक संशोधन होवून ते जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे प्रतिपादन, रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यापक, लेखक  प्रा.महावीर मुळे यांनी केले.
             दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने, सभेचे संस्थापक स्व. आण्णासाहेब लठ्ठे यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि.पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, ट्रस्टी शांतिनाथ नंदगावे, सभेच्या पदवीधर संघटनेचे चेअरमन प्रा.ए.ए.मुडलगी, जॉ. सेक्रेटरी बी.बी.शेंडगे, वैभव पाटील, कुंतिनाथ नांदणे आदी उपस्थित होते.
             ते पुढे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी वि.द.घाटे या दोघांनी अर्थमंत्री आण्णासाहेब लठ्ठे यांच्याकडे व्हॉलंटरी स्कूलच्या संदर्भात अनुदानाची मागणी केली. आण्णासाहेब लठ्ठे यांनी तात्काळ मागणीपेक्षा दुप्पट अनुदान म्हणून रु. दोन लाख रुपये मंजूर केले. या अनुदानामुळेच त्याकाळी सातारा व तत्कालीन दक्षिण सातारा ( सांगली ) जिल्ह्यामध्ये 528 व्हॉलंटरी स्कूल्स (प्राथमिक शाळा) सुरू झाल्या. यामागे तत्‌‍कालीन अर्थमंत्री स्व.दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांची दूरदृष्टी दिसून येते. 
सत्यशोधक चळवळीच्या अहमदनगर येथे झालेल्या पाचव्या अधिवेशनाचे स्व.आण्णासाहेब लठ्ठे हे अध्यक्ष होते याची तसेच त्यांच्या सत्यशोधक चळवळीमधील कार्याच्या काही नोंदी सभेच्यावतीने प्रकाशित झालेल्या य.दि.फडके यांनी लिहिलेल्या लठ्ठे चरित्रामध्ये राहिलेल्या दिसून येतात. याविषयीही पुर्नसंशोधन, पुर्नलेखन होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संबंधातील नवीन पुस्तक सभेमार्फत प्रकाशित करण्यात येईल. स्व.लठ्ठे यांच्या योगदानामुळे दि. 3 एप्रिल 1899 रोजी स्थापन झालेल्या दक्षिण भारत जैन सभेने अखंडित सेवेची 125 वर्षे नुकतीच पूर्ण केलेली आहेत, असे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.   

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.