पवार, ठाकरे, राऊत यांच्या तोफा धडाडणार...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पवार, ठाकरे, राऊत यांच्या तोफा धडाडणार...



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

पवार, ठाकरे, राऊत
यांच्या तोफा धडाडणार


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सांगता सभा होईल, अशी माहिती जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या रंजना नेवाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.



श्री. विभूते म्हणाले,‘‘शिवसेनेचे नेते संजय राऊत (ता. १) सांगली दौऱ्यावर आहेत. दुपारी एक वाजता ते भेटीगाठी घेवून संवाद साधणार आहेत. २ मे रोजी महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तासगाव येथील कोहिनूर हॉलमध्ये सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता कल्पद्रूम (नेमिनाथनगर)क्रीडांगणावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विश्‍वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत आमदार अरूण अण्णा लाड, आमदार सुमनताई पाटिल, अनिता ताई सगरे,यांची प्रमुख उपस्थिती असेल. ४ मे रोजी राष्ट्रीवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जत, येथे सकाळी ११ वाजता कवठेमहांकाळ येथे दुपरी १२/३० वाजता आणि मिरज शहर दुपारी २/३० वाजता जाहीर सभा होणार आहे. ५ मे रोजी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सांगली दौरा आहे. दुपारी एक वाजता विट्यातील कलश मंगल कार्यालयात सांगता सभा होणार आहे.’’ ते म्हणाले,‘‘भाजपच्या उमेदवारांची निष्क्रियाता आहे. त्यामुळे ते कोठेही लढाईत नाहीत. आमची लढाई अपक्ष उमेदवारांबरोबरच आहे. महाविकास आघाडीसोबत सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते सक्रीय सहभागी आहेत. त्यामुळे आमचा विजय पक्का आहे.’’

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.