मोटार सायकल चोरी करणारे आरोपी जेरबंद १,१०,०००/- रु. च्या २ मोटार सायकली हस्तगत . सांगली गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मोटार सायकल चोरी करणारे आरोपी जेरबंद १,१०,०००/- रु. च्या २ मोटार सायकली हस्तगत . सांगली गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

मोटार सायकल चोरी करणारे आरोपी जेरबंद १,१०,०००/- रु. च्या २ मोटार
सायकली हस्तगत . सांगली गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..


या गुन्ह्याची माहिती अशी की,
मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस  मोटार सायकल गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेश केले होते.

त्या अनुशंगाने दि. २४/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांचे पथकातील अजय बेंदरे यांना  मिळाले माहिती की, सांगली ते धामणी जाणारे रोडवर ग्रिन एकर्स कॉलनीसमोर तीन इसम विना नंबरप्लेटच्या दोन चोरीच्या मोटार सायकली विक्री करण्याकरीता आले आहेत.

या बातमीप्रमाणे, सांगली ते धामणी जाणारे रोडवर ग्रिन एकर्स
कॉलनीसमोरील परिसरात जावून पडताळणी करत असताना, तीन तरुण विना नंबर प्लेटच्या २ मोटार सायकलीजवळ रोडकडेला थांबलेले दिसले. त्यांचा  संशय आलेने सहायक पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन व पथकाने या व्यक्तींना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांची नावे गाव विचारता त्यांनी त्यांची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगितले 

  अनिकेत उर्फ शुभम विश्वास माने, वय २५ वर्षे, रा. एस.टी. स्टैण्डजवळ, आगळगाव, ता. कवठेमहांकाळ, 

श्रेयस गुरूसिध्द बुरूड, वय १८ वर्षे, रा. चव्हाण प्लॉट, सांगलीवाडी, ता. मिरज 
३) एक बाल अपराधी  असे असल्याचे सांगितले. 
सहायक पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, श्रेयस बूरुड याने सांगितले की, त्याचे सोबत असले बाल अपराधी  यांनी मिळून हातकणंगले गावातील विजयसिंह यादव कॉलेजसमोरुन एक मोटार सायकल चोरी केली असून अनिकेत माने यास त्याचे ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्यांने सांगितले की, सदरची मोटार सायकल ही त्याचा मित्र सदांनद उर्फ नण्या माने, रा कुपवाड याने चोरी केलेली असून ती त्याला वापरण्यास दिली असल्याचे कबूल केले.

 मिळालेल्या या मोटार सायकली बाबत पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पाहिला असता 
सायकली हस्तगत . सांगली गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

..संजयनगर आणि वडगाव पोलीस ठाणे, जि. कोल्हापुर येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाल्याने त्वरित मोटार सायकली पुढील तपास कामी सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी जप्त  करून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी संजयनगर पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग करण्यात आला असुन, पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.

लोकसंदेश न्यूज मिडिया प्रा.ली.मुंबई / सांगली.