लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील रोहीत ऊर्फ दाद्या कदम टोळी हद्दपार..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील रोहीत ऊर्फ दाद्या कदम टोळी हद्दपार..




लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील रोहीत ऊर्फ दाद्या कदम टोळी हद्दपार...

एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार रोहीत ऊर्फ दाद्या कदम टोळीस मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता हद्दपार केल आहे.

गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख


 १) रोहीत ऊर्फ दाद्या सुदाम कदम, वय २३ वर्षे, रा. दुर्गामाता मंदीरजवळ, अहिल्यानगर कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली व टोळी सदस्य 


२) शैलेश तानाजी पडळकर, वय २९ वर्षे, रा. अष्टविनायक कॉलनी, विचारे मळा, कुपवाड



 ३) रियाज बाबासाहेब मुजावर, वय ३५ वर्षे, रा. विचारे मळा, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली या टोळीविरुद्ध सन २०१७ ते २०२३ मध्ये खुन करुन पुरावा नष्ट करणे, घातक हत्याराने खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळी दमदाटी करुन इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, रात्रीची घरफोड़ी चोरी करणे अशा स्वरुपाचे शरिराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळी  ही कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी, एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.

पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन, प्रणिल गिल्डा चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, मिरज यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावनी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख १) रोहीत ऊर्फ दाद्या सुदाम कदम, वय २३ वर्षे, रा. दुर्गामाता मंदीरजवळ, अहिल्यानगर कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली व टोळी सदस्य २) शैलेश तानाजी पडळकर, वय २९ वर्षे, रा. अष्टविनायक कॉलनी, विचारे मळा, कुपवाड ३) रियाज बाबासाहेब मुजावर, वय ३५ वर्षे, रा. विचारेमळा, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या २ जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश जारी केला आहे.

 आगामी लोकसभा निवडणुका, सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबुत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

सदर कारवाईमध्ये मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सतीश शिंदे, स्थागुअ शाखा सांगली, अविनाश पाटील सहा. पोलीस निरीक्षक, एम. आय.डी.सी कुपवाड पो. ठाणे, श्रेणी पो. उपनिरीक्षक सिद्धाप्पा रुपनर, /अमर नरळे, दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली, तसेच श्रेणी पो. उपनिरीक्षक, राजेंद्र नलावडे, संदीप पाटील एम. आय. डी.सी कुपवाड पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.