सांगली काँग्रेस मध्ये बंडखोरी अटळ...
आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. काँग्रेस कमिटी बोर्डावर असणाऱ्या काँग्रेसच्या नावाच्या बोर्डातून "काँग्रेस" हा शब्द हटवला...
अखेर काँग्रेसमध्ये झाली बंडखोरी, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागवून घेतला
दि.12/04/24 सांगली काँग्रेसमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली आहे मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. काँग्रेस कमिटी बोर्डावर असणाऱ्या काँग्रेसच्या नावाच्या बोर्डातून "काँग्रेस" हा शब्द हटवला...
सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज सह सर्व तालुक्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकारी घेण्याची चिन्हे आहेत. यातच आता काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने विशाल पाटील यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झालं आहे. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत, असे असले तरी काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील ते अद्याप ठाम आहेत.
लोकसंदेश न्यूज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.