सांगलीच्या पाणी प्रश्नाबाबत नूतन अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब अलर्ट मोडवर...
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी पाणीपुरवठा व जलनिसरण यंत्रणेची पाहणी केली
अपुरा कामाबद्दल अधिकारी व ठेकेदार यांना पावसाळापूर्व कामकाज पूर्ण करण्याबाबत स्पष्ट सूचना केल्या
आज दि २८/३/२०२४ रोजी श्री अडसूळ अतिरिक्त आयुक्त यांनी सांगली जॅकवेल येथे भेट दिली तेथील कामाची पाहणी केली , सबस्टेशनचे काम सुरू आहे ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या बाबत ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत
70 एम एल डी माळ बंगला येथे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली देखील करून पाणीपुरवठा यंत्रणे कामकाज बाबत समाधान व्यक्त केले,
जलनिसरण विभागाकडील हनुमान नगर 23 एम एल डी क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राची ,सांगली ड्रेनेजचे गॅपचे काम पूर्ण करण्या बाबत पाहणी करून तेथील अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत ठेकेदारांना सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याआहेत .
अंकली पंप स्टेशन येथेही भेट देऊन पंपिंग मशनरी , इरेक्शन ची यावेळी पहाणी देखील केली आहे ,
नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, त्या साठी पाणी पुरवठा आणि जलनिसरण यंत्रणा नेहमी सज्ज असली पाहिजे, अपुरी कामे अभियंता यांनी समक्ष लक्ष केंद्रित करून वेळेत पूर्ण करून घेतली पाहिजे , मनपाच्या आर्थिक बाबीवर परिणाम करणाऱ्या कामा बाबत सदैव जागृत राहून काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयन्त केला पाहिजे या कडे लक्ष दिले पाहिजे , या बाबत या विभागाकडील अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.