पृथ्वीराज पाटील गोरगरिबांची सेवा करणारा लोकसेवक --रोहीत पाटील यांचे प्रतिपादन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पृथ्वीराज पाटील गोरगरिबांची सेवा करणारा लोकसेवक --रोहीत पाटील यांचे प्रतिपादन


लोकसंदेश न्यूज नेटवर्क

पृथ्वीराज पाटील गोरगरिबांची सेवा करणारा लोकसेवक: रोहित पाटील 

सांगली दि.७: पृथ्वीराज पाटील हे कायम गोरगरीब.. सर्वसामान्य जनतेची कामे करतात.. त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे.. सांगलीकरांसाठी ते सतत कार्यमग्न असतात. पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या माध्यमातून ते खेळाडूंना प्रोत्साहन देतात. खेळाडूंना चांगले भविष्य आहे. शासकीय सेवेत त्यांना वाव दिला जातो.पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा भरवून फौंडेशन व कबड्डी प्रेमी बिसूर गावाने रचनात्मक उपक्रम राबविला आहे असे प्रतिपादन युवा नेते रोहीत पाटील यांनी केले. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बिसूर येथे आयोजित कबड्डी स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.



यावेळी युवा नेते रोहीत पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते मैदानावर नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, वाढदिवसाच्या शुभेच्छा कबड्डी स्पर्धा आयोजित करुन बिसूरकरांनी दिल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ४८ संघांनी सहभाग नोंदविला व भरघोस प्रतिसाद दिला.


 हा उपक्रम अनुकरणीय आहे. मनगट मजबूती, सांघिक भावना आणि खिलाडूवृत्ती यासाठी कबड्डी खेळ महत्वाचा आहे. पायावरची पकड.. बोनस व क्रॅास लाईन स्पर्श हे या खेळात महत्त्वाचे आहे.. परंतु राजकारणात चांगले काम करणाऱ्यांचे पाय ओढणे इष्ट नाही. शालेय जीवनात कबड्डी खेळताना या खेळातील थरार आम्ही अनुभवला आहे. या गावातील हनुमान व्यायाम मंडळाला , पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे विजय पाटील आणि कार्यकर्ते आणि कबड्डी प्रेमी बिसूरकरांना धन्यवाद देतो.सांगली जिल्हा पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी खेळाडूना शुभेच्छा देऊन वाढदिवसाच्या निमित्ताने कबड्डी स्पर्धेचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे. युवकांना अशा खेळाची गरज आहे असे सांगितले. 

यावेळी
केक कापून पृथ्वीराज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व अभिष्टचिंतन करण्यात आले.
सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले.स्पर्धा आयोजनात अक्षय पाटील यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी जेष्ठ नेते संपतआप्पा भगत, 
खोतवाडीचे सरपंच संजय सुर्यवंशी, 
कर्नाळचे उपसरपंच नासिर चौगुले, विरेंद्रसिंह पाटील  व प्रदीप पाटील सांगली, नांद्रेचे महावीर पाटील, प्रा. एन.डी.बिरनाळे, 
रोहण एडके, कर्नाळ 
बिसूर सोसायटी चेअरमन विजय पाटील, 
ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, 
माजी सरपंच लिलावती तानाजी पाटील, 
सुशांत पतंगराव पाटील ग्रामपंचायत सदस्य, 
माजी उपसरपंच शिवाजी पाटील, 
अनिल पाटील उपसरपंच, 
अर्जुन पाटील ग्रामपंचायत सदस्य, 
नितीन पाटील सोसायटी संचालक, 
विजय धोंडीराम पाटील संचालक, 
माजी उपसरपंच रामचंद्रi पाटील, माजी सरपंच बिसूर पी. डी. पाटील, 
माजी उपसरपंच जोतीराम घारगे व कबड्डी प्रेमी बिसूर व पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.