अन् आमराईत बहरली चिमुकल्यांची चित्रकला... नमो चषक २०२४ स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद; आमदार सुधीर दादा गाडगीळ ह्यांच्याकडून आयोजन...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अन् आमराईत बहरली चिमुकल्यांची चित्रकला... नमो चषक २०२४ स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद; आमदार सुधीर दादा गाडगीळ ह्यांच्याकडून आयोजन...



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

अन् आमराईत बहरली चिमुकल्यांची चित्रकला...

नमो चषक २०२४ स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद; आमदार सुधीर दादा गाडगीळ ह्यांच्याकडून आयोजन
सांगली, ता. १४ ः रविवार सकाळची प्रसन्न वेळ...आमराईत आज वेगळीच धांदल
दिसत होती...पालक आपल्या चिमुकल्यांना घेऊन येत होते...चिमुकल्यांच्या
चिवचिवटाने आमराई बहरत होती....बघता बघता सुमारे ४ हजार चिमुकले हातात
कुंचला घेत विविध चित्रे कॅनव्हासवर रेखाटू लागले.


 आजवरच्या इतिहासात
विद्यार्थ्यांची सर्वोच्च संख्या नमो चषक चित्रकला स्पर्धेत सहभागी झाली होती. स्पर्धेचे उदघाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते झाले. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे,मुन्ना कुरणे , महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश शाळा-महाविद्यालयांना सुट्टी होती. या चित्रकला स्पर्धेसाठी आगाऊ नोंदणीही करण्यात आली होती. सुट्टी
दिवशी पालक आपल्या मुलांना घेऊन आमराईत येत होते. एरव्ही आमराईतील हिरवाई
पाहण्यासाठी येणारी चिमुकली आज हातात रंगपेटी, ब्रश व चित्रकलेचे साहित्य
घेऊन येताना दिसत होती.




सांगलीतील बहुतांश शाळा व महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळवा म्हणून आमदार सुधीर गाडगीळ ह्यांनी स्पर्धेचे आयोजन केले
सुमारे ४ हजार ४२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विक्रम केला. 'पीएनजी'चे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. भाजप सरचिटणीस विश्वजित पाटील, युवा मोर्चा पदाधिकारी अमित देसाई, अनिकेत बेळगावे, चेतन माडगूळकर, अभिषेक कुलकर्णी, दशमेश सावंत यांनी स्पर्धेचे
नियोजन केले.
युवा मोर्चाचे सिद्धांत काटकर, प्रवीण जाधव, संदीप कुकडे, धनंजय पाटील,
सिद्धार्थ विभुते, रविराज कुकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजनात मदत
केली. आमदार सुधीर गाडगीळ यांचा मार्गदर्शनाखाली रंगलेली ही चित्रकला स्पर्धा सांगलीच्या इतिहासात वेगळेपण जपणारी ठरली.
,.........
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.