सांगलीत कॉग्रेस पक्षाच्या 'डोनेट फॉर देश' अभियानाचा शुभारंभ.
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली दि. २६ :२८ डिसेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेला १३८ वर्षे पूर्ण होत आहेत.पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून कॉंग्रेस पक्षाचे जनसमर्थन वाढविणे व पक्षाच्या कार्यातील जनसहभाग वाढविणेसाठी पक्षाने' डोनेट फॉर देश' अभियानाचा शुभारंभ दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते केला. आज सांगलीत कॉग्रेस भवनमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते 'डोनेट फॉर देश' या कॉग्रेस पक्षाच्या अभियानाचा ऑनलाईलन शुभारंभ झाला.
या अभियानातून मोठया प्रमाणात पक्षाला फंड, जनसहभाग व जनसेवेसाठी उर्जा प्राप्त होईल. सांगली जिल्हयातील अनेकांनी या अभियानात मदत दिली आहे. रू. १३८, रू १३८०व रू. १३८०० अशा निधीच्या रकमा व इच्छेनुसार जादाही देता येईल यासाठी घरोघरी भेटी देऊन मदतीचे आवाहन करा असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले या प्रसंगी उपस्थित कॉग्रेस पक्षाच्या फ्रंटल संघटना, सेल व विभाग प्रमुखांनी ऑनलाईन निधी वर्ग केला या अभियानाला कार्यकर्त्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे अजय देशमुख व अशिष कोरी यांनी सांगितले. यावेळी अजय देशमुख यांनी ऑनलाईन निधी कसा वर्ग करावयाचा याचे प्रत्यक्षिक दाखविले. यावेळी सर्व फ्रंटल संघटना, सेल विभागाचे प्रमुख, उपस्थित असल्याने येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत बूथ यंत्रणा सक्षम करा, नुकत्याच चार राज्यात झालेल्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाच्या मतांमध्ये भरघोस वाढ झाली असून कर्नाटकात व तेलंगणात बहूमताने कॉंग्रेस सत्तेवर आली आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे, त्यासाठी नियोजनबध्द काम करा असे पृथ्वीराज पाटील म्हणाले.
यावेळी अशिष कोरी, आप्पासाहेब पाटील, तोफीक शिकलगार, अशोकसिंग रजपूत, अजित ढोले, ताजूद्दीन शेख, प्रा. एन.डी. बिरनाळे, राजेंद्र कांबळे, अजय देशमुख, अमित बस्तवडे, अरूण पळसूले, श्रीधर बारटक्के, किरण कांबळे, सूखदेव बुवा, विठ्ठल काळे, प्रकाश माने, याकुब मणेर, चैतन्य पाटील, अल्लाबक्ष मुल्ला, मारूती देवकर, अजित भांबुरे, अनिल मोहीते, सलमान मेस्त्री, तेजस भंडारी, सौ. प्रतिक्षा काळे, सौ. कांचन खंदारे, सौ. सिमा कुलकर्णी, सचिन चव्हाण, शैलेंद्र पीराळे, पैगंबर शेख, अयुब निशाणदार, सनी धोतरे, अर्जुन मजले, शंकर ऐवळे, चंद्रकांत डिगे, अरूण गवंडी, पृथ्वीराज चव्हाण व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.