लोकसंदेश उरण प्रतिनिधी (दिनेश पवार)
लोकनेते दि. बा.पाटील साहेब यांच्या जयंती निमित्त क्रांतीक्षेत्र जासई येथे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थाच्या दि. बा. पाटील स्फूर्ती चळवळ गुणगौरव स्पर्धा संपन्न.
: नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पुढाकाराने दि. बा. पाटील यांचे त्याग आणि विचारांचे आंदोलन साहित्य व कलेच्या माध्यमातून सतत तेवत ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या दि. बा. पाटील स्फूर्तीस्थान या चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणातील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ व या चळवळ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयांन मधील समर्पित शिक्षकांचा सन्मान सोहळा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात दि बां चे जन्मागाव क्रांतीक्षेत्र जासई येथे पार पडला.
सदर गुणगौरव सोहळा 13 जानेवारी रोजी दि. बा पाटील यांच्या जयंती दिनी त्यांच्या जन्मभूमीत उरण तालुक्यातील क्रांतीक्षेत्र जासई येथील मंगल कार्यालय हॉल मध्ये मोठ्या दिमाखदार सोहळ्यानिशी संपन्न झाला.
यावेळी सदर चळवळ स्पर्धेत दुसऱ्या चरणात विविध कला आणि साहित्य सादर केलेल्या गुणवंत विजेत्यांना व दि. बा. पाटील यांच्या कार्याची व विचारांची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या शिक्षकांस व स्पर्धेच्या संयोजकांना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. या गौरव सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, रायगड कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, दि. बा. यांचे सुपुत्र अतुल पाटील, शेकाप नेत्या सीमाताई घरत, राजेश गायकर, क्रांतीक्षेत्र जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत, उपसरपंच माई पाटील, कार्यक्रम समन्वयक सुरेश पाटील, विनोद म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर सोहळ्याचे नियोजन जासई गाव ग्रामस्थ व वाशीगाव ग्रामस्थ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
---------------------------------------
देशातील आणि नवी मुंबईतील निवासी व मूळ निवासी नागरिक यांचे मूलभूत हक्क आरक्षित आणि सुरक्षित रहावेत असा विचार दि.बा पाटील यांचा होता.देशातील सर्व धर्मियांसाठी त्यांचा त्याग व संघर्ष प्रेरणादायी होता. दि.बा पाटील स्फूर्ती स्थान चळवळ स्पर्धा हे एक आंदोलन आहे. हे आंदोलन कला व साहित्याच्या रूपाने भविष्यात प्रज्वलित रहावे हाच आमचा हेतू आहे.दि.बा. पाटील यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नजरेतून अभिप्रेत असलेल्या रयतेच्या कल्याणकारी कार्यपद्धतीचा पगडा होता. दि.बा यांनी राजश्री शाहू, महात्मा फुले आणि डॉ आंबेडकर या महापुरुषांच्या विचार आणि परंपरेचे जतन केले.
देश आणि राज्यातील मूळ निवासी यांच्या हक्क आणि अधिकार साठी संघर्ष करून त्यांनी न्याय दिला.
कोट (भाषणातील मुद्दे)- दशरथ भगत - दि. बा. पाटील चळवळ स्पर्धा आयोजक तथा माजी विरोधी पक्षनेते, न मुं म पालिका
------------------------------------------
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी आम्ही यापुढे संघर्ष करू. दि. बा.पाटील यांनी उभारलेला लढा आणि चळवळ सतत ठेवत ठेवा हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
-कॉम्रेड भूषण पाटील
------------------------------------------
नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वान्ना संयोजक म्हणून सोबत घेऊन सुनियोजित नियोजन करून लोकनेते दि.बां पाटील संघर्षमय लढायांची
यशोगाथा जगभरात जावी यासाठी लोकनेते दि बा पाटील चळवळ स्पर्धा हा अनोखा उपक्रम नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दशरथ भगत यांनी त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातुन यशस्वी केला. आपला कामधंदा सोडून भगत आणि सर्व सहकारी सलग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटत होती त्यांचे कौतुक केले पाहिजे. दि बा. पाटील साहेबांच्या संघर्ष जीवनातून बाधित पीडित यांच्यासाठी अन्याया विरोधात लढण्याची प्रेरणा केवळ चळवळ जिवंत ठेऊ शकते. दि .बा. यांच्या संघर्षाची चळवळ यापुढील काळात दशरथ भगत अविरत सूरू ठेवतील असा आशावाद आहे. दि.बा यांनी सलग 33 वर्ष संघर्ष करून विविध लढाई यशस्वी केल्या, आम्ही देखील भूमिपुत्रांच्या न्याय व हक्कासाठी काही काळ भूमिगत होतो. आज आपण प्रगती करत आहोत. मासेमारी करून उदरनिर्वाह करणार्या घटकांचे काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यांना न्याय निश्चित मिळेल.
- रामशेठ ठाकूर
माजी खासदार
-------------------------------------------
लोकसंदेश न्यूज मिडिया प्राइव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.