विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथ आज सांगली दाखल ..... महापालिकेकडून रथाचे जल्लोषी स्वागत पालकमंत्री डॉ. खाडे, आमदार गाडगीळ यांची उपस्थिती

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथ आज सांगली दाखल ..... महापालिकेकडून रथाचे जल्लोषी स्वागत पालकमंत्री डॉ. खाडे, आमदार गाडगीळ यांची उपस्थिती




विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथ आज सांगली दाखल

लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

महापालिकेकडून रथाचे जल्लोषी स्वागत पालकमंत्री डॉ. खाडे, आमदार गाडगीळ यांची उपस्थिती


केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथ आज सांगलीत दाखल झाला. या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे स्वागत सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून वाजत गाजत या संकल्प रथाचे मारुती चौकात आगमन झाले.


19 जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ सांगली मिरज आणि कुपवाड शहरात विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे.

महापालिका क्षेत्रातील या अभियानाची सुरुवात मारुती चौक येथून पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापालिका आयुक्त सुनील पवार, उपआयुक्त राहुल रोकडे, सहा आयुक्त सहदेव कावडे , अनिस मुल्ला, एम अ पाटील ,सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते , जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद , डॉ वैभव पाटील ,
अन्य अधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




 भाजपाचे ज्येष्ठनेते श्रीकांत शिंदे, प्रकाश बिरजे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी नगरसेवक युवराज बावडेकर सुबराव मद्रासी, योगेंद्र थोरात, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर गीतांजली धोपे पाटील, अविनाश मोहिते, गणपती साळुंखे, स्नेहा जगताप , स्मिता भाटकर, विशाल पवार, विजय बादवणे, रेखा पाटील , माधुरी वसगडेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

 या कार्यक्रमात पिएम स्व निधीच्या लाभार्थी अनिता लोंढे, घरकुल लाभार्थी कमल शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करीत महापालिकेच्या माध्यमातून शासनाच्या योजनाचा कसा लाभ मिळाला याची माहिती दिली. 


यावेळी मारुती चौकात महापालिकेकडून  आयोजित शासनाच्या विविध योजनेची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्वागत प्रास्ताविक आयुक्त सुनील पवार यांनी केले.

 यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची शपथ सर्वांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी केले.

आज दुपारी ३-०० वाजता कॉलेज कॅर्नर येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम आयोजित करण्यात आली आहे, लाभार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते ,मा.सन्मा सदस्य  जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे अन्य मान्यवरांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचे उद्घाटन  करण्यात आले, लाभार्थी मोठ्या प्रमाणावर या वेळी उपस्थित होते, सहा  आयुक्त सचिन सांगावकर  अनिस मुल्ला , सहदेव कावडे वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव पाटील  सह डॉक्टर त्याचा स्टाफ ,  आरोग्यधिकारी इत्यादी उपस्थीत होते 

उद्या दि ११/१/२०२४ रोजी सकाळी ९-०० ते ११-०० या वेळेत मिरज येथील किसन चौक  तर  दुपारी  ३-०० ते ५-०० वाजता म .गांधी  चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम आयोजित करण्यात येणार आहे, लाभार्थी यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन मा आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार  यांनी केले आहे 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.