संचालक डॉ. राहुल तिडके यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

संचालक डॉ. राहुल तिडके यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट....




संचालक डॉ. राहुल तिडके यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट

लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

सांगली, दि. 1/1/2023 : बदलत्या काळात नवनवीन माध्यमांचा उपयोग करून शासनाच्या योजना, भूमिका, उपक्रम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने वाटचाल करावी, अशी सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल ‍तिडके यांनी आज येथे केली.

संचालक‍ डॉ. राहुल ‍तिडके यांनी जिल्हा माहिती कार्यालयास सदिच्छा भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. जिल्हा नियोजन समिती व अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत करण्यात येत असलेल्या प्रसिद्धी मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून सदर मोहीम अधिकाधिक व्यापक करण्याच्या सूचना दिल्या.





माध्यमांचे बदलते स्वरूप व त्यांची गरज ओळखून, शासकीय उपक्रम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवमाध्यमांची मदत घ्यावी, असे संचालक‍ डॉ. राहुल ‍तिडके यांनी यावेळी सूचित केले. तसेच, कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजाबाबत, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, अधिस्वीकृती, आदि कामकाजाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली व मौलिक सूचना केल्या.

यावेळी संचालक डॉ. राहुल तिडके यांचे जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या प्रसंगी कार्यालयातील अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, सागर दळवी, नागेश वरूडे, प्रदीप थोरात उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.