तारीख ठरली. ! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात होणार खुला !!! किती असेल टोल??

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तारीख ठरली. ! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात होणार खुला !!! किती असेल टोल??



लोकसंदेश न्यूज मुंबई प्रतिनिधी पारस मुथा 

तारीख ठरली.  ! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात होणार खुला !!! किती असेल टोल??


 मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला  होणार आहे...

शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 21.8 किमी लांबीचा असून या प्रकल्पाने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार तर आहेच मात्र "महामुंबई" प्रकल्पातील आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगतीचे मार्ग खुले होणार असल्याने व मुंबईपासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या जमिनींचे भाव  गगनाला भिडणार आहेत...




 संपूर्ण महाराष्ट्राचे किंबहुना देशाचे लक्ष असणारे
प्रतीक्षेत आणि बहूचर्चित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड नववर्षात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 21.08 किलोमीटर लांबीचा न्हावा-शेवा सागरी सेतूचे 12 जानेवारी रोजी लोकार्पण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे  पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. 

शिवडी- न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंकचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. 25 डिसेंबर रोजी पुलाचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र पुलाचे थोडे काम बाकी असल्यामुळं लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला. मात्र, आता नवीन वर्षात पूल सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 



12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळं त्या दिवशीच पंतप्रधान मोदी यांना मुंबईत आमंत्रित करुन पुलाचे लोकार्पण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे कळतय.. 


राज्य सरकारकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र गेल्याचे कळते आहे. 12 जानेवारी रोजी ट्रान्स हार्बर लिंकच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावे यासाठी विनंती करण्यात आली आहे. मात्र, अजून याबाबत स्पष्ट उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेलं नाही. 


दरम्यान, येत्या 12 जानेवारीला नाशिक मध्ये राष्ट्रीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आलय. स्वामी विवेकानंद जयंती निमित्त केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणारे. या दौऱ्याच्या तयारीसाठी आज पंतप्रधान कार्यालयाची केंद्रीय समिती नाशिक मध्ये येत आहे. या दौऱ्यानिमित्ताने भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची वैशिष्ट्ये..
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशातील सर्वात मोठी सागरी पूल आहे. या पुलामुळं मुंबई- नवी मुंबईतील अंतर 30 मिनिटांवर येणार आहे. तसंच, मुंबई, नवी मुंबई आणि नियोजीत नवी मुंबई विमानतळ, जेएनपीए बंदर, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जोडला जाणार आहे. तसंच, मुंबईहून पुण्याला व गोवा कोकण मध्ये पोहोचणेही सोप्पे व जवळचे होणार आहे. या पुलामुळं पेट्रोल-डिझेलची मोठी बचत होणार आहे. 


अंदाजे 500 रुपये टोल असल्याचे समजते...

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करण्यासाठी नागरिकांना 500 रुपयांपर्यंत टोल आकारला जाण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) 22 किमी सागरी मार्गासाठी एकेरी टोल म्हणून 500 रुपयांचा टोल प्रस्तावित केला आहे.

 हा महामार्ग "महामुंबई" ला जोडणारा सेतू आसपासच्या सर्व गावांना प्रगतीचे कवाडे उघडणारा ठरणार आहे..

मुंबई  शिवडी पासून फक्त अर्धा तासाच्या अंतरावर असणाऱ्या सर्व गावांमधून एक प्रगतीचे नवे द्वार उघडून येथे फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय वृद्धी होणार असल्याने या भागात सर्व इस्टेट कंपन्यांनी आपले दालन उघडलेल आहे....

आज मिळणारा प्लॉट दोन ते तीन वर्षात किमान दहा पटीने वाढ होऊन त्याचे दर वाढतील अशी शक्यता जाणकारांच्याकडून वर्तवण्यात येत आहे..

या सेतू मुळे या भागात राहणाऱ्या सर्व गावकरी व नागरिकांना स्वर्गीयद्वारच उघडल्यासारखे आहे...


सिडको या भागातील सर्व प्रकारच्या डेव्हलपमेंट साठी आपली योजना बनवलेली आहे.. त्यामुळे या नवीन होणाऱ्या तिसऱ्या महामुंबई मध्ये योग्य व प्रमाण पद्धतीने येथे विकास होणार आहे...


त्यामुळे मुंबई ते मध्ये आपलं घर असाव या उद्देशाने येथे संपूर्ण महाराष्ट्र व भारतातील नागरिक येथे जमिनीत  खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे..

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.

8830247886