सांगलीत राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिन साजरा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगलीत राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिन साजरा...




सांगलीत राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिन साजरा...

सांगली दि. २८ : सांगली जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवनमध्ये १३९ वा राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिन शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.. 



नामदेव पठाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. स्वागत अरुण पळसुले तर प्रास्ताविक अॅड. भाऊसाहेब पवार यांनी केले. 


काँग्रेस सेवा दलाचे शहर अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना, स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमुळे झालेला विकास याची माहिती दिली. यावेळी भाऊसाहेब पवार वकील यांनी आता देशात काँग्रेस पक्षाचे जनसमर्थन वाढत असून येणाऱ्या लोकसभेत इंडीया आघाडी सत्तेवर येईल व महाराष्ट्रात महाआघाडी सरकार येणार असे सांगितले. आभार विठ्ठल काळे यांनी मानले. 



यावेळी बाबगोंडा पाटील,विजय नवले, अमित बस्तवडे, राजेंद्र कांबळे, सुरेश गायकवाड, शमशाद व जन्नत नायकवडी, शिवाजीराव सावंत मानसिंग धनवडे, बाळासाहेब शिंदे सचिन परदेशी, राजू पाटील व शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस समितीचे सदस्य व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.