घागरकोंड येथील झुलता पुलाचे काम मार्गी लावणे गरजेचे....
लोकसंदेश पोलादपूर प्रतिनिधी निळकंठ साने
तालुक्यातील जुलै 21 च्या अतिवृष्टी मध्ये तालुक्यातील घागरकोंड येथील झुळतापूल बाधित होत वाहून गेला होता यानंतर तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पोलादपूरसाठी करोडो रुपये मंजूर करण्यात आले होते दीड वर्षे नंतर ही नव्या झुलता पुलाची निर्मिती झाली नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे
झुलता पूल आणि रांजणखळगे असा सुंदर नजारा बघण्यासाठी अनेक स्थानिक तसेच पर्यटक येथे भेट देतात पण मागील दोन वर्षांपूर्वी 2021 रोजी आलेल्या महापूरात होत्याचे नव्हते झाले. आणि पोलादपूर करांची शान असलेला झुलता पूल सावित्री नदीच्या उसळत्या प्रवाहात वाहून गेला या पूलामुळे स्थानिकांना पण काहीसा रोजगार उपलब्ध होत होता तसेच अनेक येणारे पर्यटक येथे येत होते पण आता दोन वर्षापासून हे आकर्षक नष्ट झाल्याने पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. तत्कालीन सरकारने स्थानिक प्रशासनाने तेव्हा तातडीने या पुलासाठी निधी मंजूर केला होता पण अजुन दोन वर्षे संपायला आली तरी पोलादपूर करांना या झुलत्याची प्रतीक्षा आहे. आमच्याकडे झुलता पूल आहे असे अभिमानाने सांगणारे पोलादपूर कर झुलत्याच्या आठवणीने स्तब्ध होतात.
तालुक्यातील काही पर्यटन स्थळ आहेत त्या पैकी पावसाळी पर्यटन म्हणून स्थानिक पर्यटक या पुलाकडॆ भेटी देत हिरवाई सह वरून पडणारे पाण्याचा प्रवाहातून उडणारे तुषार अंगावर घेत असतात मात्र 2 वर्षे या ठिकाणी पूल नसल्याने कोणाही फिरकत नाही या मुळे या पुलाचे नव्याने काम मार्गी लागणे गरजेचे बनले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.