लोकसंदेश न्यूज पुणे जिल्हा प्रमुख - पारस मुथा
नुकसान भरपाई मागितल्याच्या रागातून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग.... पुण्यातील निलायम ब्रीज येथील प्रकार...
दुचाकीची धडक लागल्याने तरुणीने नुकसान भरपाई मागितली. याचा राग आल्याने तरुणीसोबत अश्लील बोलून विनयभंग केल्याची घटना पुण्यातील निलायम ब्रिज येथील सार्वजनिक रोडवर घडली आहे. हा प्रकार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडला आहे.
याबाबत बिबवेवाडी येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.20) पर्वती पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिपक शिवाजी अमराळे वय-36 रा. साईकृपा बिल्डींग, वडगाव बुद्रुक) याच्यावर आयपीसी 354, 427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी निलायम ब्रिज येथील सार्वजनिक रोडवरुन तिच्या दुचाकीवरुन जात होती.त्यावेळी आरोपी दिपक अमराळे याच्या दुचाकीची धडक तरुणीच्या दुचाकीला बसली.यामध्ये तिच्या दुचाकीचे नुकसान झाले. त्यामुळे तिने आरोपीकडे नुकसान भरपाई मागितली.याचा राग आल्याने आरोपीने मी वकील आहे असे बोलून मुलीला शिवीगाळ करत धमकी दिली.
तसेच अश्लील बोलून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.