लोकसंदेश न्यूज मिरज प्रतिनिधी इरफान बारगीर
माजी महापौर विवेक कांबळे यांना मान्यवरांकडून आदरांजली....
आर पी. आयचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी महापौर विवेक आप्पा कांबळे यांचे शुक्रवारी दुःखद निधन झाले.
मिरजेतील महात्मा फुले चौक येथील त्यांच्या राहत्या घरी जलदानविधीचा कार्यक्रम , विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे, मुलगा स्वेतपद्य, मुलगी निशा आणि शताब्दी यांच्या समवेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता
मिरज येथील कृष्णा घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा स्वेतपद्यने दिला पार्थिवाला मुखागी दिला. अंतिम दर्शन
घेण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. मिरज मध्ये जलदानविधीचा कार्यक्रम झाला.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवेक कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, कार्याध्यक्ष संजय कांबळे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, आर. पी आयचे नेते अशोक कांबळे, आर.पी. आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, उद्योजक सी आर
सांगलीकर, भाजपाचे नेते मोहन व्हनखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील,
राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पंद्याकर जगदाळे, शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, मिरज पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब भंडारे, राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजीत घाटे, माजी नगराध्यक्ष महादेव कुरणे, नगरसेवक पांडू कोरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर
जाधव, राष्ट्रवादीचे उत्तम आबा कांबळे, आर.पी.आय रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, गौतम, साबळे, शिवा कांबळे, डॉ. सचिन सवाखंडे, नजीर झारी, नितीन सोनवणे, नवनीत कुमार कांबळे, जहीर मुजावर, कल्पना मस्के छाया सरवदे, अपर्णा वाघमारे, मंगलराव मालगे, महादेव होवाळ, आनंदा हाचळे, नंदकुमार कांबळे, नितेश कांबळे, गणेश कांबळे, श्रीराम सासणे, अभिजित आठवले, प्रदीप कुदळे, बिठ्ठल सोनवणे, श्रीकांत कराडे, जगन्नाथ मोरे सर, तात्या
परदेशी, नितेश वाघमारे, मिलिंद मेटकरी सर, प्रभाकर नाईक, गणेश कांबळे, योगेंद्र कांबळे, डॉ. रविकुमार गवई यांच्या सहीत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो समुदायाने
स्व.विवेक कांबळे
यांना श्रद्धांजली वाहिली....
__________________________________________________________________
लोकसंदेश न्यूज मीडियाकडून स्वर्गीय विवेक (आप्पा) कांबळे यांना भावपूर्ण आदरांजली...