लोकसंदेश न्यूज नेटवर्क
कर्मवीर आण्णांचा वैचारीक वारसा कर्मवीर पतसंस्था पुढे चालवीत आहे. :- विशालदादा पाटील
विशालदादा पाटील यांचे शुभ हस्ते चिंतामणीनगर, सांगली शाखेचे उद्घाटन संपन्न...
कर्मवीर भाऊराव आण्णा आज असते तर कर्मवीर पतसंस्थेने चालविलेले कार्य पाहून भारावून गेले असते कर्मवीर आण्णांचे वैचारीक कार्य कर्मवीर पतसंस्था खऱ्या अर्थाने पुढे नेत आहे ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. सभासद ग्राहक सेवक या सर्वांचे हीत कर्मवीर पतसंस्थेने जपले आहे. त्यामुळे प्रत्येकाला ही संस्था आपली वाटत आहे. कर्मवीर पतसंस्था रु. १०० कोटीचा टप्पा पूर्ण करीत आहे पण त्यापूर्वी सभासदांचा लाख मोलाचा विश्वास या संस्थेने मिळविला आहे. हि सामान्य गोष्ट नाही अशी भावना काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष श्री विशालदादा पाटील यांनी बोलून दाखविली
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली च्या चिंतामणीनगर सांगली येथील ६० या शाखेचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कर्मवीर पतसंस्थेने सेवकांच्या साठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत त्यामुळे सेवकाची अनेक स्वप्न पुर्ण होत आहेत. त्यामुळे मलाही भविष्यात सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर मी जरून करेन असे म्हणताच उपस्थितांमध्ये हस्याची एकच लकेर उमटली.
कर्मवीर पतसंस्थेने अनेकाची स्वप्न पुर्ण करण्यासाठी मदत केल्यामुळे अनेक सुखाचे संसार उभे राहिले...
आहेत नफ्यापेक्षा सभासदांच्या हिताचा विचार समोर ठेवून संचालक मंडळाचे कार्य चालू आहे. एखादया बँकेपेक्षा ही
मोठा विस्तार संस्थेचा झाला आहे. या वेळी सभासद बँकेत रूपांतर करा असा सल्ला देखील पण संचालक मंडळाने
यावर बारकाईने विचार करूनच निर्णय घ्यावा असा मौलिक सल्ला देखील त्यांनी दिला
कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. कोणत्याही संघर्षाशिवाय समाजवाद स्थापीत करण्याचे साधन सहकार आहे. मानव जातीची सेवा करण्याच साधन देखील सहकार आहे. सामाजिक परिवर्तनासाठी सहकारामध्ये आर्थिक साक्षरता आणि सक्षमता घडवून आणण्याची क्षमता सहकारात आहे. म्हणुनच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या मार्गाने सहकारामध्ये प्रगतीचे सामर्थ्य असल्याचे श्री रावसाहेब
पाटील यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास सांगलीचे माजी उपमहापौर श्री. उमेश पाटील, नगरसेवक सौ. शुभांगी महेश साळुंखे नगरसेवक श्री. संजय कांबळे, नगरसेवक श्री मनोज सरगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
यावेळी अॅड जयंत नवले, श्री सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी या शाखेचे नुतन सल्लागार श्री. शितल जिनगोंडा पाटील, अॅड. जयंत नवले श्री मलसरजी बाबु पाटील, डॉ. सचिन गणपती पटकुरे श्री महावीर आदगोंडा पाटील व श्री. सचिन तात्या पाटील यांचा श्री विशालदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास महावीर नेमगोंडा पाटील श्री. प्रविण मगदुम श्री. अजितप्रसाद बेले श्री आदित्य अनिल
शहा, श्री अभिजीत चिमण्णा श्री. प्रदिप जाधव. श्री. व्ही. एन. सानप, श्री बाळकृष्ण जगताप. श्री ओंकार शहापुरे ,श्री. सुहास ऐतवडे ,श्री. रोहन राजमाने,श्री धिरज कारंडे निखील वाडकर, श्री कुबेर कोरोचे श्री विनोद पाटोळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ अशोक सकळे संचालक अँड एस पी मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू श्री ओ के चौगुले (नाना) डॉ. एस. बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे, सौ. चंदन के टकाळे तज्ञ संचालक डॉ नरेंद्र आनंदा खाडे श्री लालासो भाऊसो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी संस्थेचे सभासद सेवक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे संचालक श्री वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मानले सुत्र संचालन श्री. संजय सासणे यांनी केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.