खासदार संजय काका पाटील व आम् .विश्वजीत कदम आपल्या मतदारसंघासाठी एकत्रित....
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली मतदार संघातील वसगडे जि. सांगली येथील पुणे-मिरज-लोंढा रेल्वे दुहेरीकरणामुळे शेतकऱ्यांचे बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. शेतमालाची वाहतूकीसाठी रस्ता , रेल्वेच्या नवीन होणाऱ्या मार्गामुळे होणारे अडचणी, ड्रेनेजचा प्रश्न असे अनेक प्रश्न नागरिकांना अडचणीचे ठरत होते आणि पलूस - कडेगाव विधानसभा आमदार मा. विश्वजीत कदम प्रयत्न करत होते त्यासाठी सांगली जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मा पालकमंत्री यांच्यासोबत बैठकासुध्दा झाल्या होत्या परंतु, यावर योग्य तोडगा निघत नव्हता. त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन या मागण्याबाबत आंदोलने, रस्ता रोको, जल समाधी आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते ..
तरीही मार्ग निघत नव्हता. या प्रश्नासाठी कोण कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा आपली बांधिलकी आपली जबाबदारी म्हणून खासदार संजय काका पाटील यांनी या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री मा.ना.रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करून या ज्वलंत प्रश्नाबाबत तत्काळ लक्ष वेधण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली
या वेळी झालेल्या चर्चेत हमाल पंचायतीचे विकास मगदूम ह्यानी देखील हमालां चे प्रश्न मांडले. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून मंत्री महोदयानी आज छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथे तत्काळ बैठक लावून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. यावेळी या बैठकीसाठी खासदार संजय काका पाटील , आमदार विश्वजीत कदम, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सांगली तसेच महसूल विभागातील अधिकारी नरेश लालवणी जनरल मॅनेजर सेन्ट्रल रेल्वे
इंदुरणी दुबे , केलास वर्मा भाजप रेल्वे आघाडी, व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या जिल्ह्यासाठी दोन वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी एकत्रित येऊन कोणताही पक्षपात न करता जनतेचे व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मंत्री महोदय समोर आपली मागणी मांडत व त्या मान्य करून घेतल्या त्यामुळे नागरिकांतून या दोघां नेत्यांचे कौतुक होत आहे...लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/
सांगली.