रायगड जिल्हा पोलादपुर:वाकण ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

रायगड जिल्हा पोलादपुर:वाकण ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा



वाकण ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला...

लोकसंदेश न्यूज रायगड जिल्हा प्रमुख : निळकंठ साने

पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी वाकण ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम मोतीराम जंगम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले 


व उपसरपंच नारायण राजाराम सकपाळ यांनी दीपप्रज्वलन केले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 26नोव्हेंबर 1949रोजी देशाला संविधान अर्पण केले स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा पुरस्कार करणारे भारतीय संविधान म्हणून आज 26नोव्हेंबर रोजी संपुर्ण देशांमध्ये संविधान दिन साजरा केला जातो
यावेळी वाकण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका त्रिशीला गंभीरे यांनी शपथ सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत दिली यावेळी या कार्यक्रमासाठी वाकण ग्रामपंचायतचे सरपंच शांताराम मोतीराम जंगम उपसरपंच नारायण राजाराम सपकाळ सदस्य विठोबा शंकर गायकवाड अनंत जगु कुंभार सदस्य संध्या नितीन गुरव माजी सदस्य लक्ष्मण दगडू पवार पांडुरंग साने निळकंठ साने आदि मान्यवर उपस्थित होते 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.