लोकसंदेश न्यूज नेटवर्क
नांद्र्याचा पंचवार्षिक विकास आराखडा तयार करा-त्यामध्ये मुबलक पाणी पुरवठा व गटार बांधणीला प्राधान्यक्रम ठेवा.
----नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करताना पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन
सांगली दि. १२:नांद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलने एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट,अमित पाटील, यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदासह १४ जागेवर भरघोस मतांनी विजय संपादन केला आहे . आज सरपंच सौ. पूजा भोरे व नवनिर्वाचित १४ सदस्यांनी शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात येऊन बाबांची भेट घेतली. त्यावेळी यशोधनच्या वतीने सरपंच सौ. पूजा महावीर भोरे व नवनिर्वाचित १४ सदस्यांचा फेटा बांधून पृथ्वीराज पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी सरपंच पूजा भोरे म्हणाल्या, 'गेल्या बारा वर्षात नांद्रे गावची लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार ती साडे दहा हजार होती ती आता बावीस हजाराहून अधिक झाली आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी सुधारित पाणी पुरवठा योजना करावी लागेल. यावेळी पृथ्वीराज यांनी लगेच प्रांत मा. उत्तम वाघ यांना फोन केला आणि २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या दाखला देणेसाठी तहसीलदार यांना आदेश करणेची मागणी केली. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे प्रांत मा. उत्तम वाघ यांनी मान्य केले. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी पृथ्वीराज म्हणाले,एन.एस.पाटील, राजगोंडा पाटील गुमट, अमित पाटील, मनोज पाटील, महावीर पाटील व मनोज भोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलने सरपंच पदासह १४ जागा जिंकून एक हाती सत्ता आणली त्याबद्दल यशोधन तर्फे सर्वांचे अभिनंदन. नांद्रे गावच्या सगळ्या समस्यांचा आढावा घेऊन पंचवार्षिक विकास आराखडा तयार करा.. त्यामध्ये पाणी पुरवठा व गटार बांधणी कामाला प्राधान्य द्या. गेल्या बारा वर्षात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी सुधारित पाणी पुरवठा योजना खात्याकडे सादर करा.. जनतेच्या आरोग्यासाठी गटार बांधणीचे काम हाती घ्या. गावचा विकास सुनियोजित व चांगल्या पद्धतीने होण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी मी पुढाकार घेईन.नांद्रे गावच्या विकासासाठी माझे कायम भरघोस सहकार्य आहे व यापुढेही कायम राहील.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. एन.डी.बिरनाळे, नांद्रे ग्रामविकास पॅनेलचे नेते राजगोंडा पाटील गुमट, मनोज पाटील, महावीर पाटील, अमित पाटील, महावीर भोरे व नवनिर्वाचित सदस्य सत्तार मुजावर, शितल कोथळे, हेमलता वाले, आण्णासाहेब पाचोरे, विलासमती पाटील, दिलीप मदने, सुवर्णजित काकडे, रंजना कांबळे, दिपाली साळुंखे, अमितकुमार पाटील, शालन पाचोरे, जगन्नाथ वाले, मयूर चौगुले व समिना मुल्ला उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.