तासगाव कारखान्याच्या विस्तारीकरणाची भूमिका कौतुकास्पद ना. सुरेश खाडे. जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितत 'तासगाव' च्या गळीत हंगामात सुरुवात....
लोकसंदेश न्यूज तासगांव प्रतिनिधी
चार-पाच वर्ष बंद असणारा तासगाव कारखाना खासदार संजय काका पाटील यांनी हिमतीने सुरू केला आहे. काकांनी कारखान्याची क्षमता वाढवणे, डिस्टिलरी सुरू करणे टरबाइन ऐवजी इलेक्ट्रिफायड करून विस्तारीकरणाची केलेली घोषणा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुरेशभाऊ खाडे यांनी केले. एस जी झेड अँड एस जी ए शुगर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे च तासगाव कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात खाडे बोलत होते यावेळी खासदार संजय काका पाटील आ. विश्वजीत कदम, आमदार गोपीचंद पडळकर , वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, हुतात्मा साखर कारखान्याचे वैभव नायकवडी , भाजपचे नेते सत्यजित देशमुख , सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एस टी वाघ , मनमंदिर उद्योग समूहाचे अशोक भाऊ गायकवाड, सिद्धार्थ गाडगीळ, मन्सुर खतीब , सुरेश शिंदे , विट्याचे शंकर नाना मोहिते ,संग्राम माने,राजाराम गरुड, जे के बापू जाधव, बाळासाहेब पवार, नितिन नवले, सुरेंद्र वाळवेकर, राजाराम बापू पाटील , अभय जैन, भालचंद्र पाटील, डॉ. अनिल कोरबू अरुण राजमाने , आर. एस. कुलकर्णी, भाजपा सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, अरुण बालटे प्रभाकर जाधव, सुनिल पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुरेश खाडे म्हणाले साखर कारखाना चांगला चालला की ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबरच कारखान्याचे कामगार ऊस तोडणी कामगार यांचाही फायदा होत असतो केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी साखर उद्योगाला ताकद देण्याची भूमिका घेतल्यामुळे राज्यातील साखर उद्योग जोमाने उभा राहील असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी तासगाव कारखाना सुरू केल्याबद्दल संजय काकांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय कष्टातून दिनकरआबा नी सुरू केलेला कारखाना सुरू करण्यासाठी आपण नेहमीच काकांना आग्रह केल्याचे विशाल पाटील यांनी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर कर्नाटकातील साखर कारखान्यांच्या वजनात फरक पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस देण्याची विनंती यावेळी विशाल पाटील यांनी केली
यावेळी बोलताना वैभव नायकवडी यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव कारखाना चांगल्या पद्धतीने चालेल असा विश्वास व्यक्त केला . यावेळी माजी मंत्री विश्वजीत कदम आमदार गोपीचंद पडळकर भाजपचे नेते सत्यजित देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एमडी एसटी वाघ यांनी कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या
एस जी झेड अँड एस जी ए शुगर प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना, साडेतीन हजार ते चार हजार मॅट्रिक टन च्या दरम्यान गाळप करून जिल्ह्यातील इतर कारखाने देतील त्या बरोबरीने उसाला दर देण्याची घोषणा खासदार संजय काका पाटील यांनी केली पुढील हंगामात कारखान्याचे विस्तारीकरण करून कारखान्याची क्षमता वाढवण्याची घोषणा ही यावेळी संजय काका यांनी केली त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कामगार कारखान्याचे अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याचा विश्वास यावेळी संजय काकांनी व्यक्त केला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.