सरकार मानव निर्मित घटना घडवून,निष्पाप रुग्णाचा बळी घेऊन आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे_________राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सरकार मानव निर्मित घटना घडवून,निष्पाप रुग्णाचा बळी घेऊन आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे_________राज्य प्रवक्ते संतोष पाटील.



लोकसंदेश न्यूज मिडिया नेटवर्क

सरकार मानव निर्मित घटना घडवून,निष्पाप रुग्णाचा बळी घेऊन आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे___राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

देशातील गोधरा हत्याकांड घडवून पूर्ण गुजरातमध्ये मानवनिर्मित दंगल घडवून आणणे, मुंबईवर दहशत हल्ला घडवून शेकडो नागरिकांचे बळी घेतलेली, पुलवामा हल्ल्यामध्ये निष्पाप सैनिकांचा बळी घेणे,बॉम्बस्फोट करून सर्व सामान्य जनतेचे बळी घेणे हे केंद्र व राज्यातील काही लोकांकडून घडवून आणले आहे.अशाच प्रकारे ठाण्यामधील सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूचे तांडव, ठाण्यामधील रस्त्याचे काम चालू असताना झालेली दुर्घटना किंवा गुजरात मधील झुलता फुलाचे काम चालू असताना घडलेले घटना ह्या मानवनिर्मित घडवून आणून निष्पाप लोकांचा हाकनाक बळी घेतला जातो कारण राजकीय पोळी भाजून घेणे किंवा एका घटनेकडून दुसऱ्या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी असे काही कटकारस्थान रचून घडवले जातात.



 त्यातच राज्यातील आणि केंद्रातील सरकार चालवताना एखाद्या प्रकारामध्ये अपयश येत आहे अशी कळताच जनतेचे एकीकडून दुसरीकडे लक्ष वळवण्याच्या उद्देशाने या मानवनिर्मित घटना घडवल्या जातात त्याचंच उदाहरण म्हणजे नांदेड येथील सरकारी रुग्णालय मध्ये घडलेला प्रकार यामध्ये सर्वसामान्य रुग्णाचा निष्पाप बालकांचा बळी घेऊन सरकार काय सिद्ध करणार आहे हे येणारा काळच जाणे परंतु या गेलेल्या निष्पाप बळीचा जवाब या सरकारला भविष्यात द्यावाच लागेल. 


राज्यकर्त्याकडून मानवनिर्मित घटना घडवल्या जाणाऱ्या अशा कृत्याचा सर्वसामान्य जनतेतून तीव्र निषेध होत आहे हे सरकार सर्वसामान्य जनतेचे नसून ते  भांडवलदारांचा आहे हे सिद्ध झाले आहे यावरून सरकारमध्ये प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे कुठल्याही टोकाला जातात व ते गेले ही आहेत अशीअनेक घटनांवरून हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नांदेडमध्ये जे सरकारी हॉस्पिटलमध्ये निष्पाप बालका चा व सर्वसामान्य रुग्णाचा बळीच घेतला गेला आहे हे कोणी ज्योतिषाने सांगायला नको कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीही साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला पोहोचतात हे मागील काही घटना वरून सिद्ध झाले आहे याचाच भाग म्हणून नांदेड येथे झालेले घटनेचे उदाहरण आहे असे सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया उमटू लागले आहेत अशी माहिती


 मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली