सभासदांचा विश्वास हेच कर्मवीर पतसंस्थेचे बलस्थान :- श्री. रावसाहेब पाटील आष्टा शाखा अद्यावत कार्यालय लोकार्पण प्रसंगी काढले उद्गार...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सभासदांचा विश्वास हेच कर्मवीर पतसंस्थेचे बलस्थान :- श्री. रावसाहेब पाटील आष्टा शाखा अद्यावत कार्यालय लोकार्पण प्रसंगी काढले उद्गार...




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सभासदांचा विश्वास हेच कर्मवीर पतसंस्थेचे बलस्थान :- श्री. रावसाहेब पाटील आष्टा शाखा अद्यावत कार्यालय लोकार्पण प्रसंगी काढले उद्गार

आष्टा :- आष्टा नगरीने कर्मवीर पतसंस्थेला भरभरुन प्रेम दिले, तसेच कर्मवीर पतसंस्थेने ही कर्जाच्या रुपाने येथील सामान्य माणूस उभा करण्याचे काम केले असे उद्गार कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी काढले.

कर्मवीर पतसंस्थेच्या शाखा आष्टा येथे रु. २१ कोटीच्या ठेवी आणि रु. १३ कोटीचे कर्जे वाटप अशी वाढती उलाढाल आणि ग्राहक सेवेचा विचार करून आष्टा शाखेचे आधुनिक कार्यालयात रूपांतर करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्याक्रमात ते बोलत होते.

प्रारंभी दिपप्रज्वलन व कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. संस्थेचे संचालक मंडळ स्थानिक सल्लागार व आष्टा शहरातील मान्यवरांच्या हस्ते रिबन कापून नुतन अद्यावत कार्यालय ग्राहक सेवेस समर्पित करण्यात आले.

सांगली शहरात लावलेले एक छोटेसे रोपटे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात आधुनिक सेवेने नावारुपाला आले असून संस्थेची सभासद संख्या ६०००० • पेक्षा अधिक झाली आहे. रु. ९५१ कोटीच्या ठेवी ७५० कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्था सभासदांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य देत आली असून सभासदांचा एक आणि एक रुपया सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांनी सभासदांना दिला. संस्थेच्या ६० शाखामधुन सभासदांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभत असून येत्या दिपावली पर्यंत रु. १००० कोटीचे ठेवीचे उद्दीष्ट संस्था संपादन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आष्टा ही सहकार पंढरी असून कर्मवीर पतसंस्था सभासदांच्या सेवेस सदैव तत्पर राहील हे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी शाखेचे सल्लागार डॉ. धवल दिनेश मालगांवे श्री. प्रशांत आण्णासो मालगांवे श्री. राजाराम आप्पासो वाडकर, श्री. दादासो बाळा कुकडे यांच्यासह नवनियुक्त सल्लागार सदस्य श्री. नाभिराज आप्पासो रुकडे श्री. तेजस प्रकाश महाजन व श्री. सुशांत बाबासो रुकडे यांचा संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी श्री. अमोल तांबवेकर व विभागीय अधिकारी श्री. नितीन पाटील आणि इंटेरिअर डेकोरेटर श्री. अक्षय पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक श्री. संदिप तांबवेकर, डॉ. प्रविण वंजाळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन श्री. दिलीप वग्याणी यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास आष्टा येथील अनेक सहकारी संस्था बँकांचे प्रतिनिधीसह श्री. प्रकाश रुकड़े

श्री. वैभव थोटे, इंजि. अरविंद खोत, श्री. सुनिल कवठेकर, श्री. अभिजीत वाडकर श्री राजकुमार चौगुले श्री आप्पासो वाडकर, श्री. राहुल थोटे, श्री धन्यकुमार पाटील श्री. सचिन मोरे, अॅड. अभिजीत वग्याणी, अॅड. मनोज झिणगे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या

या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस. पी. 1. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ए. के. चौगुले (नाना ) श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले. डॉ. एस. बी. पाटील (मोटके ). मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे तज्ञ संचालक श्री. लालासो भाऊसो थोटे यांनी मानले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.