आज वैद्यकीय व विशेष सहाय्य मंत्री मा. हसन मुश्रीफ यांना सांगली येथे सांगलीचे सिविल हॉस्पिटल ची दुरावस्था व असणाऱ्या मागण्या बाबतीत सविस्तर खुलासा पुढील प्रमाणे....
मा. ना. हसनजी मुश्रीफसो,
वैद्यकीय विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीच्या समस्येबाबत
विषय :-
अधिष्ठातांचे दुर्लक्ष....
महोदय,
वसंतदादा पाटील रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांचा सकाळी १० ते १ राऊंड असतो त्यावेळी ते फिरकत सुद्धा नाहीत. त्यांना रुग्णांशी काही देणे-घेणे नाही ते मिरज मेडिकल कॉलेजमध्ये बसूनच असतात. ते निष्काळजीपणे वागत आहेत. रुग्णालयात काही कमतरता आहे याबाबत ते कायम निष्काळजी असतात. सदरठिकाणी सक्षम अधिष्ठाता असावयास पाहिजे. सदर रुग्णालयामध्ये त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
नांदेड मधील शासकीय रुग्णालयातील औषधाच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयात आणि मिरज शासकीय रुग्णालयात औषधासह इतर सोयी सुविधांचा तुटवडा पडल्याने नांदेड सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे,
१) अधिष्ठाता नियमीतपणे सांगली सिव्हील येथे फिरकत नाहीत. २) सर्वसामान्य औषधे उपलब्ध नाहीत व ती बाहेरुन लिहून दिली जातात. ३) सार्वजनिक आरोग्य विभागाप्रमाणे पार्टिशिफीशन फ्री हॉस्पिटल ही संकल्पना राबविणे व तसे दर्शनी भागामध्ये बोर्ड लावणे. ४) तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन ज्याचे आयुक्त स्तरावरुन मॉनिटरिंग करणे यास अधिष्ठाता याना जबाबदेही करावे. ५) मशिनरी बंद असलेबाबत :- गरोदर बायकासाठीचे मशिनरी बंद आहे. (रोज सुमारे ३० बाळंतपणे होतात.). संपूर्ण हॉस्पिटलसाठी एकत्रीत सोनोग्राफी मशिन आहे. सी.टी. स्कॅन मशीन उपलब्ध नाही. हे सर्व अजब धोरण जिथे तज्ञ डॉक्टर उपलब्ध तेथे मशीन नाही म्हणजे गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखानाशिवाय मार्ग नाही.
(2) रक्त तपासणी :- मेडिकल कॉलेजचे हॉस्पिटल असताना रक्त तपासण्या बाहेर
का पाठविले जातात? अर्थपूर्ण व्यवहार, अधिष्ठाता यांचे सोयीस्कर दुर्लक्ष, अकार्यक्षमता. रुग्णांना आर्थिक भुर्दड, महात्मा फुले व जननी सुरक्षाच्या तपासण्या
होणे अपेक्षीत असताना त्या सुद्धा खाजगीत पाठविले जातात.
रक्तपेढी नूतनीकरण, नातेवाईक यांच्यासाठी दैनंदिन विधीसाठी सोयीसुविधा, पोस्टमार्टम विभाग नवीन बांधणे, व्हेंटिलिटर मशीन नवीन बसविणे. इत्यादी सोयी सुविधा करणेत यावीत.
गेल्या दीड वर्षापासून रुग्णांना बाहेरुन औषधे आणावी लागत आहेत. तसेच सांगली व मिरज रुग्णालयात एम.आर.आय. मशीन व सिटी स्कॅन मशीन नाही. तसेच याठिकाणी सी.सी.टी.व्ही. नादुरुस्त आहेत. तरी वरील अधिष्ठाता यांची बदली करणेत यावी व याठिकाणी एक सक्षम अधिष्ठाता नेमावा अश्या सर्व मागण्या करण्यात आल्या आहेत
माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, यांना निवेदन देताना आमदार सुधीर गाडगीळ, मनोज भिसे, संतोष पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्राइवेट लिमिटेड मुंबई / सांगली.