अनिर्बंध विशेषाधिकार गाजवण्याचा कोणालाही, कोणताही अधिकार कायद्याने दिलेला नाही.:
व्याख्याते शाहीन शेख.
मिरज - लोकहितासाठी असणारा माहिती अधिकार कायदा, त्याचा जनहितार्थ सामूहिक वापर केला पाहिजे. व्यक्तीस्तोम माजवण्यासाठी करू नका. कर्मचारी अधिकारी जनतेचे सेवक आहेत. ती माणसेच आहेत. कोणी परिपूर्ण नाही. एका व्यक्तीच्या गैर कारभारामुळे सर्वांना दोषी ठरवता येत नाही. असे मनोगत माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने माहिती अधिकार व्याख्याते शाहीन शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके होते. यावेळी सेवा हक्क अधिनियम, अभिलेख व्यवस्थापन अधिनियम, दप्तर दिरंगाई कायदा इत्यादी कायद्याचीही माहिती श्री. शेख यांनी दिली. प्रस्ताविक स्वागत कक्ष अधिकारी माळी यांनी केले. लोकशाहीत जनता ही सार्वभौम असून, त्यांना सन्मानाची वागणूक देण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.. विस्तार अधिकारी ए.टी. मगदूम यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. रमजान खलिफा, अर्थराज्याचे अल्ताफ खतीब, योगेश पांडव, मच्छिंद्र कांबळे माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.