सांगली निवासी उपजिल्हाधिकारीपदी ज्योती पाटील यांची नियुक्ती .....जिल्ह्यात पाच नवे उपजिल्हाधिकारी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली निवासी उपजिल्हाधिकारीपदी ज्योती पाटील यांची नियुक्ती .....जिल्ह्यात पाच नवे उपजिल्हाधिकारी





सांगली निवासी उपजिल्हाधिकारीपदी ज्योती पाटील यांची नियुक्ती .....जिल्ह्यात पाच नवे उपजिल्हाधिकारी...


   उपजिल्हाधिकारीपदी ज्योती पाटील यांची       नियुक्ती 

गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी अखेर ज्योती पाटील नियुक्ती करण्यात शासनाने बुधवारी याबाबतचे आदेश दिले. विजय पाटील यांच्या बदलीपासून हे पद रिक्त होते. पाटील यांच्यासह जिल्ह्यात रिक्त असलेल्या पाच उपजिल्हाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यात जत प्रांताधिकारी म्हणून अजय नष्टे यांची नियुक्ती करण्यात आली .


जतचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची खेड (जि. पुणे) येथे बदली झाल्यापासून जतचे पद रिक्त होते. आता अजय नष्टे हे पदभार यांची सांभाळणार आहेत. निवडणूक उपजिल्हाधिकारी भैराप्पा माळी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर नीता सावंत- शिंदे यांची नियुक्ती करण्या आली आहे.

याशिवाय कोल्हापूरच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी सविता लष्करे, अजय पवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. भूसंपादनच्या वर्षा शिंगण यांची कोल्हापूरच्या जिल्हा पुनर्वसन निवासी अधिकारीपदी बदली झाली आहे.

जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचे पद असलेल्या
उपजिल्हाधिकारीपदी विजय पाटील यांनी खूपच कमी कालावधीसाठी काम केले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांची बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती पाटील या
कार्यरत होत्या

जिल्ह्यात पाच उपजिल्हाधिकारी यांची पदे रिक्त असल्यामुळे इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार सोपवला होता. त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार होता. रिक्त पदांवर नियुक्तीसाठी शासनाकडे लोकप्रतिनिधी व पालकमंत्री यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर नियुक्ती झाली आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली