कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य श्री. सुखदेव शामराव गिरी यांची अध्यक्षपदी निवड....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य श्री. सुखदेव शामराव गिरी यांची अध्यक्षपदी निवड....



   लोकसंदेश न्यूज कोल्हापूर

प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्य शासनाने विभागीय अधिस्वीकृती समित्या 11 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये गठित केल्या आहेत. कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत मतदान प्रक्रियेने समितीचे सदस्य श्री. सुखदेव शामराव गिरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक (मा.) सुनिल सोनटक्के यांनी दिली.

कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात आज अध्यक्षीय निवडीसाठी कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री. गजानन नाईक, निखील पंडीतराव, समीर देशपांडे, प्रताप नाईक, सदस्य सचिव तथा उपसंचालक (मा.) सुनिल सोनटक्के, जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग मुकुंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली संप्रदा बीडकर, सहा.संचालक फारुख बागवान, उपसंपादक रणजित पवार उपस्थित होते.

प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती नियमान्वये राज्य शासनाने राज्य व विभागीय अधिस्वीकृती समित्या गठित केल्या आहेत. कोल्हापूर माहिती विभागातर्गंत कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांना देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृतीपत्रिका विषयक कामकाज या समितीव्दारे करण्यात येणार आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली