समाज प्रिय, दिलदार व प्रेमळ एकनिष्ठ व्यक्तिमत्व जयसिंगराव (तात्या) शेंडगे जनमाणसातला माणूस , माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले, काही वाईट पण मनात घर करणारे जी अनेक माणसं जगताना त्यातले एक तुम्ही. विचारवंत आणि बुध्दीमान नेते म्हणून आम्ही तुमचा कायम आदरच करतो. आपल्या शुर आणि निर्भय नेतृत्वाबद्दल संपूर्ण समाज बांधव आशा करतात की, आपण नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असाल एक उत्तम व्यक्तिमत्व असणारे तात्या नेहमी क्षमतेच्या पलीकडे जाऊन विचार व स्व विकासासाठी व संस्थेच्या विकासासाठी नेहमी नवीन कल्पना सुचवितात. व तात्या एक व्यक्ती म्हणून नव्हे तर आम्ही एक व्यक्तिमत्व म्हणून पहात आहे पाहत आहोत. समाज रत्न माजी राज्यमंत्री, आमचे दैवत शिवाजीराव (बापू) शेंडगे यांच्या विचारांचा अखंड वारसा तात्याच सांभाळत आहेत, आजही तालुका व जिल्हा बाहेर तात्यांचा जनसंपर्क चालू आहे, गाव गाड्यातील वाडी वस्तीपर्यंत व तळागाळातील गोरगरीब दीनदलित दुर्लक्षित समाजापर्यंत पोहोचणारे व सर्वांशी आपुलकीने विचारपूस करणारे तालुक्यातील एकमेव नेते आहेत. तात्यांनी समाजासाठी दिलेले योगदान व समर्पण खरोखरच प्रशंसनीय प्रेरणा दायित्व आहे .एन टी आरक्षणाचे जनक माजी राज्यमंत्री शेंडगे (बापू) च्या मंत्री काळात तात्या स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहायचे व बापूंनी भटक्या जाती व जमाती साठी शेकडो आश्रम शाळा राज्यात चालू केल्या व त्यांनी स्वतः एक ही आश्रम शाळा स्वतःकडे न ठेवता त्या आश्रम शाळा कार्यकर्त्यांना वाटून टाकल्या व स्वतः कवठेमंकाळ मध्ये समाजातील दुर्लक्षित घटकातील (अपंगाची) दिव्यांगाची मूकबधिर शाळा चालू केली. व शेकडो मूकबधिर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आज कवठेमंकाळ येथे तात्यांच्या मार्गदर्शनाखाली वात्सल्य मूक बधिर विद्यामंदिर कवठेमंकाळ व शिवाजीराव (बापू) शेंडगे निवासी मतिमंद मुलांचे विद्यालय कवठेमंकाळ या दिव्यांग शाळा भव्य दिव्य स्वरूपात सुरू आहेत व सर्व तालुक्यातील दिव्यांगांना सल्ला व मार्गदर्शन चालू ठेवले आहे. समाजकारण व राजकारणाविषयी चालू असलेली लढाई अखंडपणे सुरू ठेवावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सांगली संचलित, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समाज नेते, जयसिंगराव (तात्या) शेंडगे आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता, आणि सह्याद्रीची उंची व बिरोबाचा आशीर्वाद लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तात्या. शुभेच्छुक, विजय ठेंगील सर
शिवाजीराव बापू शेंडगे निवासी मतिमंद मुलांची विद्यालय कवठेमंकाळ तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली मुख्याध्यापक विजय ठेंगील सर धुळा कोळेकर सर विष्णू आसवले सर पाटील मॅडम हंकार मॅडम कोळगे मॅडम आनंदा शेजाळ तुकाराम माने कृष्णा खोत पूजाताई होनमोरे दिपाली बल्लारी पूजाताई नरळे श्रीकांत माळी इत्यादी कर्मचारी वर्ग विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याकडून माननीय श्री जयसिंग तात्या शेंडगे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..
लोकसंदेश मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली