लोकसंदेश न्यूज कोल्हापूर
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम प्रथम वर्ष "प्रारंभ-२३" या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न..
जयसिंगपूर / प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात संजय घोडावत खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मान्यता प्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष “प्रारंभ-23” या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्रा. स्वप्निल थिकने, गटनिदेशक, अविनाश पाटील, अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचे प्रमुख, प्रा. अजय कोंगे, प्रा. विनायक पावटे, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग प्रमुख, प्रा. सागर चव्हाण, प्रा. एस. एम. डिसोजा, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख, प्रा. नितीन पाटील, यांत्रिक अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभाग प्रमुख, प्रा. रवींद्र धोंगडी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सुजित मोहिते यांनी प्रास्ताविकात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पाच वर्षे कार्यकालाचे आणि सलग पाच वर्ष १०० टक्के प्रवेशासाठी आमच्या संस्थेवर विश्वास ठेवलेल्या पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे विविध मुद्दे अधोरेखित केले.
प्रा. अजय कोंगे यांनी प्रास्ताविकात मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्टे आणि स्वतःचे कौशल्य विकसित करण्याचे महत्त्व हा अभ्यासक्रमातून रोजगार व स्वयंरोजगार निर्मित करण्यासाठी किंवा स्वतःचे नवीन नाविन्यपूर्ण संकल्पना सहित स्टार्टअप सुरू करण्यासाठी महत्त्वाची आणि या अभ्यासक्रमास विविध उपलब्ध असणार्या सुविधांची स्पष्ट केल्या.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सलग पाच वर्ष १०० टक्के प्रवेशाची प्रकीर्या यशस्वी पार पाडल्या त्याबद्दल सर्व टीम व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. गिरी म्हणाले व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा तुम्हाला आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनःपूर्वक स्वागत करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थांना निर्माण होणारा रोजगार आणि स्वयंरोजगार याविषयी मार्गदर्शन करून ज्या प्रमाणे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १०० टक्के प्रवेश होतात. त्याच प्रमाणे शंभर टक्के सर्व विद्यार्थांना रोजगार देण्याचे काम ही संस्था गेली पाच वर्ष करत आहे. विद्यार्थ्यांनी शिस्त, शिक्षण आणि दैनंदिन उपस्थिती याला अत्यंत महत्त्व असून सातत्याने कष्ट केल्यानंतर फल निश्चित प्राप्त होत असते हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित मोहिते यांनी केले तर आभार संजय घोडावत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रा. स्वप्निल थिकने यांनी मानले.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले यांनी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.