लोकसंदेश न्यूज नेटवर्क
आटपाडी येथे 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर कालावधीत
दुग्ध व्यवसाय शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण.....
सांगली, : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम. सी. ई. डी.) सांगली यांच्यावतीने पंचायत समिती, आटपाडी येथे दुग्ध व्यवसाय व शेळीपालन कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने दिनांक 27 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम आयोजक दत्तात्रेय पुकळे (मो. नं. 9689927976) एम. सी. ई .डी. द्वारा पंचायत समिती आटपाडी येथे संपर्क साधावा व तालुक्यातील शेतकरी व बेरोजगार युवकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे व प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.