लोकसंदेश न्यूज नेटवर्क
महानगरपालिका क्षेत्रात वाहतूक नियमन
सांगली, दि. 7 : सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतुक व्यवस्था सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जड वाहने, शहरी व ग्रामिण एस. टी. बसेस या वाहनांसाठी मनाई मार्ग बाबतचा प्रायोगिक तत्वावर जाहीरनामा प्रसिध्द केला आहे.
जड वाहतुक, शहरी व ग्रामिण एस.टी. बसेस, ट्रॅव्हल्स या वाहनांना प्रवेश बंद / मनाई मार्ग पुढीलप्रमाणे. (१) सांगली एस.टी. स्टॅण्ड रेवणी रोड - तरूण भारत स्टेडीयम कॉर्नर - नवसंदेश कॉर्नर - हरभट रोड - मैत्रिण कॉर्नर - शाळा नं. १ चौक (करमरकर चौक) - तानाजी चौक - बुरूड गल्ली - कर्नाळ पोलीस चौकी हा रस्ता जड (एसटी बसेस, ट्रॅव्हल्स इ.) वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. (२) सांगली एसटी स्टॅण्ड रेवणी रोड - महानगरपालिका चौक - डावीकडे वळण घेऊन पश्चिमेस - हरभट रोड - उवजीकडील बाजूस वळण घेऊन उत्तर बाजूस मैत्रिण कॉर्नर - शाळा नं. 1 चौक (करमरकर चौक) - तानाजी चौक - बुरूड गल्ली - कर्नाळ पोलीस चौकी हा रस्ता जड (एसटी बसेस, ट्रॅव्हल्स इ.) वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. (३) सांगली शहर पोलीस ठाणे चौक - पश्चिमेकडे - डावीकडे वळण घेऊन - शाळा नं. 1 चौक (करमरकर चौक) - तानाजी चौक - बुरूड गल्ली - कर्नाळ पोलीस चौकी हा रस्ता जड (एस.टी. बसेस, ट्रॅव्हल्स इ.) वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी वाहतूक व्यवस्था मार्ग पुढीलप्रमाणे. (१) जड वाहतुक, शहरी व ग्रामिण एस.टी. बसेस, ट्रॅव्हल्स वाहनांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था मार्ग पुढीलप्रमाणे. सांगली एस.टी. स्टॅन्ड - रेवणी रोड - महानगरपालिका चौक - सांगली शहर पोलीस ठाणे चौक – उजवीकडे पुर्वेकडील बाजुस वळण घेऊन - राजवाडा चौक - स्टेशन रोड - स्टेशन चौक - आझाद चौक - आमराई चौक - कॉलेज कॉर्नर चौक मार्गे सोईनुसार जाता येईल. (२) इस्लामपूर, पलुसकडून येणारे जड, एस. टी. बसेस, ट्रॅव्हल्स वाहनांसाठी शहरात येण्याचा मार्ग - शिवशंभो चौक - शिवशंभो चौकातून उजवीकडे (दक्षिणेकडे वळण) घेऊन कर्नाळ रोड - कर्नाळ पोलीस चौकी - डावीकडे वळण घेऊन - पटेल चौक - राजवाडा चौक मार्गे शहरात येता येईल.
हा जाहीरनामा दि. 1 जे 30 जुलै 2023 रोजीपर्यंत 30 दिवसाकरीता प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. नागरीक, रहिवाशी, वाहनधारक यांनी वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. हरकती, सुचना असल्यास पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा सांगली यांच्याकडे लेखी स्वरुपात पाठवाव्यात. प्राप्त सुचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतुक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
___________________________________________