मुंबई:नेहमी चर्चेत असणाऱ्या व अनेक नेत्यांची बदनामी करणाऱ्या सुपारी बहाद्दर किरीट सोमय्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल ....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुंबई:नेहमी चर्चेत असणाऱ्या व अनेक नेत्यांची बदनामी करणाऱ्या सुपारी बहाद्दर किरीट सोमय्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल ....




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

नेहमी चर्चेत असणाऱ्या व अनेक नेत्यांची बदनामी करणाऱ्या सुपारी बहाद्दर किरीट सोमय्याचा अश्लील
व्हिडिओ व्हायरल ....

नेटक-यांनी धू धू धुतले...

भाजपकडून मौन....

भ्रष्टाचाराचे खोटे आणि बेछूट आरोप करून अनेक नेत्यांना बदनाम करणारा, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा 'बोगस वस्त्रहरण' कार, भाजप नेता किरीट सोमय्या उघडा - नागडा पडला आहे. 'ब्लॅकमेलिंग'चा एकमेव उद्योग असलेल्या या भाजपच्या पोपटाचे विकृत चाळे जगासमोर आले आहेत. सोमय्याच्या सेक्स स्कँडलच्या तब्बल 35 व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या असून या स्कँडलमुळे प्रचंड मोठा धमाका झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अणुबॉम्बच फुटला आहे. सोमय्याची सर्वत्र छी थू केली जात असून त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. सोमय्याच्या आक्षेपार्ह व्हिडिओनंतर राजकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.


ईडी ईडीच्या नादात सीडी निघाली... नेटकऱ्यांनी सोमय्याला धू धू
धुतले....


भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आज एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेक यूजर्सने भाजप आणि किरीट सोमय्याला फोडून काढले आहे.

'ईडी- ईडी करण्याच्या नादात कधी सीडी बाहेर बाहेर आली कळलंच नाही', 'कपडे उतरविणाऱ्यांचेच आज कपडे उतरलेले दिसले.

किरकिऱ्या विकृतांचे प्रताप आज साऱ्या देशाने पाहिले', 'पार्टी विथ डिफरन्स आता आम्हाला समजले, धाक ईडीचा इतरांना, डाव स्वतः रडीचा खेळले, ब्लॅकमेल करणारेच फिमेल सोबत दिसले', किरीट सोमय्या यांचा पत्रकार सोबतचा फोटो दाखवून 'मैने आपको कंटेंट दे दिया है', असा फोटोवर मजकूर लिहिला. अनेकांनी तर हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे, असे सांगत भाजपला डिवचले.


              व्हिडीओत नेमके काय?

व्हिडीओत किरीट सोमय्या उघडे - नागडे आहेत. झोपून अश्लील चाळे करताना दिसत आहेत. मध्येच त्यांचे व्हिडीओ चॅटिंगही सुरू असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका आलिशान रूममधील ही दृष्ये आहेत. असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावा लोकशाही वाहिनीने केला आहे.

                   कमळाबाईचे मौन

किरीट सोमय्याचे सेक्स स्कँडल समोर आल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. यावर कोणताच भाजप नेता प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. विविध पक्षांतून यावर तीव्र प्रतिक्रिया येत असताना सोमय्यांच्या चाळ्यांवर भाजपने मात्र मौन बाळगले आहे.

     8 तासांच्या तब्बल 35 व्हिडीओ क्लिप्स

नेहमी चर्चेत असणाऱ्या व अनेक नेत्यांची बदनामी करणाऱ्या सुपारी बहाद्दर किरीट सोमय्याचा अश्लील
व्हिडिओ व्हायरल .... 



लोकशाही या वृत्तवाहिनीने किरीट सोमय्याच्या लंपटपणाचा
पर्दाफाश केला आहे. हे सेक्स स्कँडल हादरवणारे आहे. आठ तासांच्या तब्बल 35 क्लिप्स व्हायरल झाल्याचा दावा वृत्तवाहिनीकडून करण्यात आला आहे.

             सर्वत्र संतापाची लाट

सोमय्यांचे चाळे समोर येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. हिंगोलीत शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत सोमय्या यांचा पुतळा जाळून निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या वतीने उद्या मुंबईत निदर्शने करण्यात येणार आहेत.

ईडी, सीबीआयचा धाक दाखवून सोमय्या यांनी अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. काही महिलांचे शोषण केल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. आता बोललो तर त्या महिलांची ओळख दाखवावी लागेल. यासंदर्भात मी योग्यवेळी बोलेन..

- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

दुसऱ्यांवर चिखल उडविणारे सोमय्या स्वतः चिखलात लोळतायत. महिलांसोबत सोमय्या असे अश्लील प्रकार करत असतील तर त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही. याची गृहमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. भाजपने सोमय्यांची हकालपट्टी करावी. - विद्या चव्हाण, राष्ट्रवादी

            योग्य कारवाई व्हावी

मी व्हिडीओ बघितला नाही, तो आक्षेपार्ह असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी.

• तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या -


      आचरणातील विकृती समोर आली

किरीट सोमय्या यांच्या विचारातील विकृती आजवर सर्वांनी पाहिली आहे, या व्हिडीओच्या निमित्ताने आता त्यांच्या आचरणातील विकृती समोर आली आहे. अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद हा प्रकार आहे. - किशोरी पेडणेकर, माजी महापौर

'बेटी को भाजप से बचाव' म्हणण्याची वेळ आलीय

किरीट सोमय्या हे भाजपचे बडे नेते आहेत. अशा व्यक्तीचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर येत असेल तर ही धक्कादायक बाब आहे. त्याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. किरीट सोमय्या यांच्यापूर्वी आजवर भाजपच्या अनेक बडया नेत्यांचे
आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे बेंबीच्या
देठापासून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असे म्हणणाऱ्या
भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळे 'बेटी को भाजप से 'बचाव' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

• अतुल लोंढे, काँग्रेस प्रवत्ते

           प्रचंड धमाका! सेक्स स्कँडल ..... 


किरीट सोमय्या यांच्याकडे राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती म्हणून आम्ही पाहतो. सर्वांवर ते भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करत सुटतात. सुपारी घेतल्याप्रमाणे काम करतात आणि दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीचे वर्तन त्यांच्याकडून येते तर ते अधिक अधोरेखित होते. ही एक विकृत प्रवृत्ती आहे. हिसाब देना पडेगा. दुसऱ्यांचे चारित्र्यहनन करणाऱ्यांनी आता स्वतःचे चारित्र्य तपासावे.

 - सचिन सावंत, काँग्रेस प्रवत्ते

कलंकित माणसाची असलियत जगासमोर आली

किरीट सोमय्या यांनी आजवर अनेक विधानसभा- लोकसभा सदस्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम केले आहे. आता अनेक महिलांनादेखील त्यांनी ब्लॅकमेल केल्याचे माझ्या कानावर आले आहे. या कलंकित माणसाची असलियत आज या व्हिडीओमुळे जगासमोर आली आहे. 

- यशोमती ठाकूर, काँग्रेस आमदार..

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.