अखेर रिझर्व्ह बँकेने वाईतील हरिहरेश्वर सहकारी बँकेचा परवाना केला रद्द. संस्थापक नंदकुमार खामकर अद्याप जेल मध्येच ..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अखेर रिझर्व्ह बँकेने वाईतील हरिहरेश्वर सहकारी बँकेचा परवाना केला रद्द. संस्थापक नंदकुमार खामकर अद्याप जेल मध्येच ..


लोकसंदेश न्युजसाठी सातारा दौलतराव पिसाळ वाई

अखेर रिझर्व्ह बँकेने वाईतील  हरिहरेश्वर सहकारी बँकेचा परवाना केला रद्द. संस्थापक नंदकुमार खामकर अद्याप जेल मध्येच ..


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्नाटकातील तूमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.  या बँकांकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने त्यांचा परवाना रद्द केल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

      वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेन ११ जुलै २०२३ पासून बँकिंग व्यवसाय करणे बंद केले आहे. असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने निवेदनात नमूद केले आहे. हरिहरेश्वर सहकारी बँकेचे सुमारे ९९.९६ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्‍कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून मिळण्यास पात्र आहेत. या बँकांचे परवाने रद्द केल्यामुळे या बँकांना बँकिंग”चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे यासह इतर गोष्टींचा समावेश आहे.तसेच सध्याची आर्थिक स्थिती पाहाता या बँका त्यांच्या सध्याच्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देऊ शकणार नाहीत, असेही आरबीआयने नमूद केले आहे. ८ मार्च २०२३ पर्यंत बँकेच्या एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी ५७.२४ कोटी रुपये आधीच दिली आहे. 
      येथील हरिहरेश्वर बँकेमध्ये ११२ बनावट कर्ज प्रकरणे करुन तब्बल ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३४४ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हा लेखापाल विजय सांवत यांनी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संस्थापक संचालक २९ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  हरिहरेश्वर बँकेचे चेअरमन
अजित गुलाबराव खामकर, व्हाईस चेअरमन जगन्नाथ बाजीराव सावंत, संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर, संचालक वजीर कासमभाई शेख, मनोज श्रीधर खटावकर, प्रकाश केरबा ओतारी, विलास गणपत खामकर,
चंद्रकांत धर्माजी शिंदे, विष्णूपंत शंकर खरे, अर्जुन दिगंबर खामकर, जनार्दन आनंदा वैराट, किरण भास्कर कदम, सौ. जयश्री वसंत चौधरी, सौ. जयमाला विजय खामकर, तज्ञ संचालक गोविंद तुकाराम लंगडे, अरुण महादेव केळकर, संतोष शिवाजी चोरगे, व्यवस्थापक रमेश दगडू जाधव,  वाईचे शाखा प्रमुख विनोद मनोहर शिंदे, खंडाळय़ाचे शाखा प्रमुख रणजित खाशाबा शिर्के, वडूथचे शाखा प्रमुख सुनील चंद्रकांत वंजारी, भुईंजचे शाखा प्रमुख वसंत आनंदा सणस, वाई शाखेचे रोखपाल सुचित महादेव जाधव, वडूथ शाखेचे रोखपाल महेश प्रताप शिंदे, भुईज शाखेचे रोखपाल दीपक धर्माजी शिर्के, खंडाळा शाखेचे रोखपाल तानाजी मानसिंग भोसले, सनदी लेखपाल राहुल धोगंडे, डी. बी. खरात, एन.एस.कदम यांनी २०११ ते दि. ३१ मार्च २०१९ च्या दरम्यान हरिहरेश्वर डेव्लपर्स वाई या फर्मच्या नावाने सोनगिरवाडी येथील सर्व्हे नंबर. ७१/२ व सर्व्हे नंबर २५/१अ/२/३ या मिळकतीवर ६२ कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाणखत व कर्जप्रकरणे दाखवून बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दाखवून कर्ज घेवून बँकेची, सभासदांची व ठेवीदारांची फसवणूक केली होती.
      तसेच वजीर कासमभाई शेख यांनी सिटी सर्व्हे नंबर १२२४,२०२४, ६६५, ५८७, ३२७ सर्व्हे नंबर १०८/२ या मिळकतीवर एशियन डेव्हलपर्स या फर्मचे नावे ५० कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाण खत व कर्ज प्रकरणे दाखवून बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दाखवून बँकेतून संबंधितांच्या नावे कर्ज घेवून बँकेच्या सभासदांची व बँकेची
व सभासदांची फसवणूक केली आहे. पदाचा गैरवापर करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता सभासद, ठेवीदार यांचा विश्वासघात करुन ११२ बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेची २६ कोटी ८७ लाख ८ हजार ७८९ रुपयांचा गैरविनीयोग केलेला आहे.
       हरिहरेश्वर बँकेच्या २०१५-१६, २०१६-१७, २०१८-१९ या कालावधीत प्रत्यक्षात बनावट कर्ज खात्यावर रक्कमेचा भरणा न करता ११२ कर्ज खात्यावर रक्कम भरणा केल्याचे दाखवून १० कोटी २४ लाख ४२ हजार १५४ एवढय़ा
रक्कमेचा अपहार केला आहे. तसेच भद्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्था यांनी हरिहरेश्वर बँकेत ठेवलेल्या व परत काढून घेतलेल्या गुंतवणूकीवर बनावट ठेव तारण कर्ज प्रकरण तयार करुन ती रक्कम बँकेच्या बनावट कर्ज खात्यावर भरणा केली. पुढे भद्रेश्वर पतसंस्थेचे ठेव तारण कर्ज निरंक करण्यासाठी छ. संभाजी महाराज पतसंस्था पिंपोडे शाखावाई, किसान नागरी सहकारी पतसंस्था वाई यांनी बँकेत ठेवलेल्या व परत केलेल्या गुंतवणूकीवर ठेवतारण कर्ज निर्माण करुन ४४ लाख ३८ हजार ४०१ रुपयांचा अपहार केला आहे.
    हरिहरेश्वर बँक वाई या बँकेतील आर्थिक निधीचा गैरविनियोक व अपहार करुन बँकेच्या ठेवीदारांची, सभासदांची ३७ कोटी, ४६ लाख, ८९ हजार ३४४ रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली होती. यातील संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर वगळता इतर सर्वांची जमीनवर मुक्तता करण्यात आली आहे.

लोकसंदेश न्युज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली