"दुनिया झुकती है" "झुकानेवाला चाहिए" आता असा प्रत्यय अलीकडे आपल्या राजकारणात दिसून येत आहे...
या वर्षभरात ज्या घडामोडी घडल्या त्यात मनोरंजनाची बाब म्हणजे "तारक मेहता का उल्टा चश्मा" पहिल्यासारखे सगळं चाललेलं आहे...
जनतेला उल्लू बनवून कसं राजकारण करावे ...फक्त महाराष्ट्रातच शिकायला मिळेल....
जो तो ...मग तो... कोणत्याही पक्षाचा असो. आपलं वर्चस्व असावं.. आपल्या हातात सत्ता असावी या साठी याची होड सुरू आहे...
मजेची बाब म्हणजे ...केंद्रामध्ये भाजपच सरकार आहे त्यांनी ईडी, सीबीआय, व इन्कम टॅक्सच्या माध्यमातून सर्व राजकारण्यावर एक जाळ फेकून ठेवलेल आहे...
आता या जाळ्यामध्ये सर्वच विरोधी पक्षाचे नेते नक्कीच अडकणार आहेत... म्हणजे कोणीही या जगात (भाजपच्या नेत्यांसह)धुतल्या तांदळासारखा नाही... त्यामुळे भाजपनेही मस्त चाल खेळलेली आहे ....
ऐन केन प्रकारे आपल्या हातात सत्ता राहावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करतय आहे आणि ते यशस्वी देखील होत आहेत...
आता राष्ट्रवादीचे म्हणायचं झालं तर 70 हजार कोटी, वीस हजार कोटी, दहा हजार कोटी ,असे बरेच भ्रष्टाचाराचे आकडे आहे सर्वसामान्य माणूस ऐकून होता....
परंतु या आकड्याचा बाजारात... आपली सत्ता हस्तगत करण्याची किमया नक्कीच भाजपने केलेली आहे...
सर्वसामान्य नागरिकांनी फक्त "धारावाहिक" म्हणून हे सर्व पाहण्याचे आहे त्याच्या पलीकडे त्याच्या हातात काही नाही. .
मध्ये एक "No Entry" नावाचा हिंदी चित्रपट आला होता त्या चित्रपटांमध्ये लॉज मध्ये कोण कोणाची बायको, आणि कोणाचा मित्र, कोणाच्या मित्राची कोणती बायको आहे या लॉज वाल्याला कळत नसते... यामध्ये तो "भंजाळून" गेलेला असतो .. त्याच्यातलाच काहीसा प्रकार आता महाराष्ट्राच्या नागरिकांना भेडसावतो आहे...
कोण म्हणते... अजित पवार फुटले ,कोण म्हणतंय जयंत पाटील बाजूला झाले, कोण म्हणतंय दोन वेगवेगळे पक्ष झाले ,असं काही झालेलं नाही, ईडीची चौकशी राष्ट्रवादीच्या वीस खांबावर म्हणजे जे दिग्गज नेते होते त्यांच्यावर हे जाळं पसरून टाकलेलं होतं... त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त मंडळी कदाचित तुरुंगात दिसली असती .. त्या साठीच शरद पवार साहेबांनीच ही खेळी खेळली असल्याची जनता बोलत आहे ...
वाशिंग पावडर निरमा "भाजपच् वाशिंग मशीन" मध्ये जाऊन हे सर्वजण या वर्षभरात धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होऊन आल्यानंतर परत राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊनच लढणार आहेत ...त्याच्यात कोणतीही शाशंकता नसावी....
असो...
नागरिकांना आमची एकच विनंती आहे की, कृपया हा विषय फार डोक्यात न घेता एकमेकांचे डोकी न फोडता. आपण आपल्या उद्योगाला लागावे ...अन्यथा नुकसान तुमचंच आहे ..समोरच्या टीव्हीमधील बातम्या मधून आपल्या डोक्यात हा विषय घेऊ नये .. हे निवडणुकीपर्यंत असंच चालणार आहे... त्यामुळे एक मनोरंजनाची बाब म्हणून आपण या सर्वांनी याच्याकडे पाहावे....
व्हाट्सअप वर आलेली एक पोस्ट..
शिवसेनेचे भास्कर जाधव बोलले.. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र आहेत.
अजितदादा बोलले... एकनाथ शिंदे आणि आम्ही चांगले मित्र आहोत.
भाजपचे फडणवीस बोलले... दादा आणि आमचे संबंध खूप चांगले आहे.
स्वतः एकनाथ शिंदे बोलले... भास्करराव आमचे काही शत्रू नाहीत, अजितदादा आमचे चांगले मित्र आहेत.!!
आता हे सगळे एकमेकांचे मित्र असतांना आपण कोणत्या एकमेकांच्या शेतात बकऱ्या सोडल्यात..?? 😃
आपणही एकमेकांचे मित्र आहोत.
वादविवाद हा वैचारिक पातळीवर मनोरंजन म्हणून करा.
फार जीवाचा तीळ पापड करून घेण्याची गरज नाही..!!
शेवटी आपणही सर्व एकमेकांचे चांगले मित्र आहोत..!
😃 🚩 !! जय महाराष्ट्र !!🚩 👍👍👍🤝🤝🤝🤝🤝
काल रात्री राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची भाषणे ऐकली, दोघे गट बरोबर बोलत होते, कुणीच चुकीचे बोलत नव्हता.
मग बराच वेळ विचार केला आणि लक्षात आले की चूक आपलीच आहे. कारण आपण कामधंदा सोडून यांचे भाषण ऐकत आहोत...!!
"आपला पक्ष, दुकानात लक्ष" 🤩🤩
वरील बाबीचा विचार करून आपण सर्वांनी आपल्या आपल्या उद्योग व्यवसायामध्ये लक्ष द्यावे...
ही विनंती ...
आपला: संपादक :लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
8830247886