लोकसंदेश न्यूज मीडिया नेटवर्क
मोठी बातमी ! सावधान कोल्हापूरकर. व कोकणवासी...
कोल्हापूर जिल्ह्यातील 76 गावांना दरड कोसळण्याचा अलर्ट....
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत अनेकांच्या कुटूंब उद्धस्त झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील 76 गावांना भूस्खलनचा धोका असल्याचे समोर आले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यातील कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने ४३ बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली. इस्रोने केलेल्या सर्वेक्षणातून देशात भूस्खलनचा धोका असलेल्या १४७ जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली, या यादीत कोल्हापूरातील ७६ गावांचा समावेश आहे. यामध्ये राधानगरी (३१ गाव), शाहूवाडी (२० गाव) आणि भुदरगड तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयार केलेल्या यादीतील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पावसळ्यात कोल्हापूरात नेहमी पूर परिस्थिती निर्माण होते. पावसामुळे कोल्हापूरात दरड कोसळणे, भूस्खलन आणि रस्ते खचण्यासारख्या अनेक घटना घडत असतात.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील या गावातील सर्व नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा....
रत्नागिरी
राजापूर : धोपेश्वर खंडेवाडीतील ३५ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा
राजापूर : मागील दोन दिवसांपासून सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने भूस्खलनाचा धोका असलेल्या धोपेश्वर खंडेवाडीतील सुमारे ३५ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा प्रशासनाकडू देण्यात आल्या आहेत.याबाबत धोपेश्वर, खंडेवाडी येथील महापुरूष मंदिरात संबंधित
ग्रामस्थांसह बैठक पार पडली. त्यावेळी राजापूरच्या
प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव,गटविकास अधिकारी विवेक गुंड, पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, ग्रामसेवक निरंजन देसाई आदी उपस्थित होते. राजापूर शहरानजीक असलेल्या धोपेश्वर खंडेवाडी येथील डोंगराला यापूर्वी तडे गेले असून तेथे भूस्खलन देखील झाले होते. भूस्खलन होण्याबाबतचा इशारा यापूर्वी भू वैज्ञानिकांकडून देण्यात आला होता.
गेले दोन दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने अतिवृष्टीत भूस्खलन होण्याचा धोका अधिक आहे. या धोकादायक परिसरात सुमारे ३५ कुटुंबे वास्तव्याला असून जवळपास शंभराच्या आसपास ग्रामस्थांचा समावेश आहे. ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पर्यायी व्यवस्थाही देण्यात आली आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया आपणास आवाहन करीत आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढलेल आहे .. नदी व नाले पात्राच्या बाहेर वाहत आहेत, धरणे बंधारे भरलेली आहेत, शक्यतो बहुत करून कोकणामधील डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांनी ,जरी सरकारने नोटीसा अथवा अलर्ट दिला नसेल तरी, आपल्या सुरक्षितेचे साठी कृपया आपण पावसाळा होई पर्यंत सुरक्षित जागी स्थलांतर होणे आपल्या कुटुंब व आपल्यासाठी गरजेचे आहे ,अशा वेळी सरकारची नोटीस अथवा अनुमान न पाहता आपणच सुरक्षित ठिकाणी ...आपल्या कुटुंब व जनावरांच्या सहित स्थलांतरित व्हावे..
असे नम्र आवाहन लोकसंदेश न्यूज मीडिया आपणास करीत आहे
आपला: संपादक ;लोकसंदेश न्यूज मीडिया.8830247886
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.