लोकसंदेश न्यूज सातारा जिल्हाप्रमुख
दौलतराव पिसाळ
अनवडी ग्रामपंचायतीच्या महिला
सदस्या सौ.सिंधू गुरव यांचे अपघाती निधन .गावावर शोककळा .
वाई तालुक्यातील अनवडी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सौ.
सिंधू जनार्दन गुरव वय ६५ यांचे खंडाळा तालुक्यातील मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाणार्या एस कॉर्नरवर त्यांचे अपघाती निधन झाल्याने अनवडी गावावर शोककळा पसरली आहे .
घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी कि जनार्दन गुरव हे अनवडी गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य असलेल्या सौ .सिंधू जनार्दन गुरव या आपल्या पत्नीला मालकीच्या दुचाकीवर पाठी मागे बसवून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सातारा पुणे या महा मार्गावरून खंबाटकी बोगदा पास करुन पुण्याकडे जात असताना त्यांची दुचाकी खंडाळा तालुक्यात मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाणार्या एस कॉर्नरवर त्यांची दुचाकी साडेचार वाजण्याच्या सुमारास आली त्या वेळी खंबाटकी बोगद्याचा असणार्या तिर्व उतारा वरुन एक मालट्रक भरघाव वेगाने येत असताना त्या वेळी ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने पुढे चालत असलेल्या दुचाकीला या मालट्रकने पाठी मागुन जोराची धडक दिल्याने सौ.सिंधू गुरव या दुचाकीवरुन महामार्गावर पडल्या तरी देखील या चालकाला ट्रक थांबवता न आल्याने उलट त्या चालकाने खाली कोसळलेल्या सौ.सिंधू गुरव यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना अक्षरशः चिरडून टाकले .या भिषण अपघातात सौ.सिंधू गुरव यांचे निधन झाल्याने अनवडी गावावर शोककळा पसरली आहे .
या भिषण अपघाताची माहिती अनवडी ग्रामस्थ आणी खंडाळा पोलिसांना समजताच हे सर्वजण
अपघात स्थळावर दाखल झाले .खंडाळा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवुन त्याचा पंचनामा करुन
तो शवविच्छेदना साठी खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे .या भिषण अपघाताची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली आहे .याचा अधिक तपास खंडाळा पोलिस करीत आहे.अपघात ग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई