लोकसंदेश न्यूज सातारा
जिल्हाप्रमुख दौलतराव पिसाळ
कृषी विभाग पोहोचला वाई तालुक्यातील बोरगाव येथील शेताच्या बांधावर....
वाई दि. 08 जुन 2023 महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मौजे बोरगांव व पंचक्रोशीतील शेतकरी यांचे करिता तालुका कृषी अधिकारी,वाई श्री प्रशांत शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व आढावा सभा व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण दरम्यान मा.तालुका कृषी अधिकारी श्री. प्रशांत शेंडे यांनी सन 2023-24 मधील येणारा खरीप हंगाम चे सविस्तर नियोजन व कार्यपद्धती प्रथमतः शेतकऱ्यांना समजावून सांगितले.तदनंतर सोयाबीन घरगुती बियाणे वापर,उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक,शेतीशाळा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड ,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी, महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, आत्मा योजना, व मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील शासकीय योजनांची जत्रा यांची सविस्तर माहिती दिली.
श्री संग्राम पाटील विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी, भात पिकाचे पूर्व मशागत, बियाणे निवड, बीज प्रक्रिया, लागवड पद्धत, एकात्मिक खत व कीड व रोग व्यवस्थापन बाबत सखोल मार्गदर्शन केले.
श्री. सचिन पवार कृषी प्रर्यवेक्षक यांनी सोयाबीन पिक बीजप्रक्रिया, वान निवड, किड व रोग व्यवस्थापन तसेच कृषी यांत्रिकीकरण, महाडीबीटी, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना गांडूळ युनिट, नाडेप या योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री सुभाष चव्हाण कृषी सहाय्यक वडोली यांनी पीक विमा व भात,सोयाबीन, व हरभरा या पिकांसाठी पिक स्पर्धा याविषयी सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर श्री सोमनाथ पवार कृषी पर्यवेक्षक यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमामध्ये सन 2021 22 हंगामासाठी राबविण्यात आलेल्या पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप देवरे आत्मा बीटीएम यांनी व श्री. विजय गायकवाड मंडळ कृषी अधिकारी मेनवली यांनी आभार प्रदर्शन केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई