मी माझ्या साहेबांना भेटायला चाललोय; ते ही सायकलवरून : कट्टर शिवसैनिक - अनिल पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मी माझ्या साहेबांना भेटायला चाललोय; ते ही सायकलवरून : कट्टर शिवसैनिक - अनिल पाटील




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

मी माझ्या साहेबांना भेटायला चाललोय; ते ही सायकलवरून : कट्टर शिवसैनिक - अनिल पाटील

"मी माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललोय ते ही सायकलवरून खात्री आहे ते मला नक्कीच भेटणार कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना भेटतात त्यांची कामे करतात कामाचं कौतुक करतात ते अगदी आपले माझे मुख्यमंत्री वाटतात" - एका शिवसैनिकांची भावना....

    तो आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटायला चक्क सायकलवरून मुंबईला जायला निघालाय .... ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील मिरजेहून एक सच्चा शिवसैनिक अनिल पाटील बोलताना म्हणतात की...आजपर्यंत कधीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असो की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना भेटलो नाही पण आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला सायकल वरून निघालो आहे. कारण हे मुख्यमंत्री मला माझे मुख्यमंत्री वाटतात एका शिवसैनिकांचे हे बोल आहेत. एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायची असेल तर कोणी बडवे मध्यस्थी घालावे लागत नाहीत. ते अगदी राज्यातील कोणीही त्यांच्याकडे आला तर अगदी सहज ते त्याला भेटतात त्याची विचारपूस करतात. त्याची अडचण त्याचे काम करतात आणि कुठं अडलंय याची प्रेमानं , आपुलकीनं चौकशी करतात. त्यांच्या समस्या सोडवतात. म्हणून ते जनतेचे लाडके व आवडते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या भेटीला सांगली ते ठाणे असा सायकल प्रवास करून अनिल पाटील आपलं स्वप्न पूर्ण करणार आहे.

 या पूर्ण प्रवासात शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ  चंडाळे यांची त्यांना खंबीर साथ लाभली आहे. अनिल पाटील यांचा सांगली शिवसेना जनसेवा कार्यालय येथून निघताना त्यांचे मनोबल वाढवून संपूर्ण  शिवसेना सांगली जिल्हा यांच्या कडून त्यांचा सत्कार ही करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे, शहर प्रमुख संदीप ताटे शहर संघटक सारंग पवार, समीर लालाबेग, स्वप्नील मस्कर, सम्राट दळवी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई