सातारा: केंजळ गावात आदर्श असणार्या जगताप कुटुंबियांन वर नवरदेवाच्या आत्महत्येला सामोरे जाण्याचा दुर्दैवी प्रसंगाने गाव हादरले .

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा: केंजळ गावात आदर्श असणार्या जगताप कुटुंबियांन वर नवरदेवाच्या आत्महत्येला सामोरे जाण्याचा दुर्दैवी प्रसंगाने गाव हादरले .




सातारा /वाई : लोकसंदेश न्यूज
प्रतिनिधी ओंकार पोतदार

केंजळ गावात आदर्श असणार्या जगताप कुटुंबियांन वर नवरदेवाच्या आत्महत्येला सामोरे जाण्याचा दुर्दैवी प्रसंगाने गाव हादरले .

केंजळ ता.वाई येथील राहुल सुरेश जगताप वय २६ याने भट नावाच्या शिवारातील गुरांच्या गोठ्या शेजारी असणार्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने दि.१० रोजी सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .
राहुल हा प्रगतीशील शेतकरी आणी आदर्श कुटुंब व्यवस्थे मधील एक सदस्य होता .
तो मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने गावात आणी परिसरात त्याचा मित्र परिवार मोठा होता .त्याच्या अचानक मृत्यूची माहिती गावासह मित्रांना समजताच गाव आणी मित्रांचा या घटनेवर विश्वास बसत नसल्याने सर्वांनी राहुलच्या गोठ्या कडे धाव घेतली आणी त्या ठिकाणी राहुलचा मृतदेह पाहून शंकेला पुर्ण विराम मिळाला .

राहुलचे नुकतेच लग्न ठरले होते .हे लग्न उद्याच्या सोमवारी होणार होते
त्या मुळे घरात मंगलमय वातावरणासह लगीनघाईची धावपळ सुरू आहे .
शुक्रवार दि.९ रोजी घरात राहुलच्या लग्नाची मुहूर्तमेड उभारण्यात आली
तर आज शनिवारी घाण्याचा शुभ कार्यक्रम असल्याने घरातील महिला मंडळाने शुक्रवारी घरोघरी जाऊन महिला सुवासीयांना हळदी कुंकू लावुन आमच्या लाडक्या राहुलच्या घाण्याच्या कार्यक्रमाला या असे आग्रहाचे निमंत्रण देत महिला घरोघरी फिरुन आल्या .
राहुल रात्री जेवण करुन गोठ्यावर
झोपायला गेला होता .पण त्याचा पाठलाग करत काळही राहुल सोबतच गोठ्यात मुक्कामी झोपला
होता .रात्र वैर्याची आहे जागते रहो
याची पुसटती कल्पना देखील राहुलला आली नसल्याने अखेर राहुलवर ऐन घाण्याच्या दिवशीच घाला घालुन राहुलच्या लग्नाचे स्वप्नांचा चक्काचुर करत त्याचेही आयुष्य संपवले .आणी लग्नाच्या मुहूर्तमेड शेजारीच दुर्दैवाने राहुलचा मृतदेह आणुन ठेवण्याचा प्रसंग या आदर्श कुटुंबियांन वर ओढविल्याने
लगीनघाईच्या आनंदाच्या धामधूमीत असणार्या या जगताप कुटुंबियांन वर दुःखाचा डोंगर कोसळल्याने आख्ये केंजळ गाव
शोक सागरात बुडाले .
केंजळ ता.वाई येथील जगताप कुटुंब हे एकत्र कुटुंब पध्दतीची वडर्लाजीत परंपरेची गौरवशाली प्रथा जपणारे हे गावातील एक आदर्श कुटुंब म्हणून या घराकडे
आख्या केंजळ गावचे नागरीक आदर्श उदाहरण म्हणून चांगल्या नजरेने पाहत असते .असा या कुटुंबियांचा नाव लौकिक आहे .
पण दुर्दैवाने याच कुटुंबातील सदस्य
असलेले राहुल सुरेश जगताप वय २६ याच्यावर काळाने झडप घालुन
२५ ते ३० कुटुंब सदस्य संख्या असलेल्यांना शोक सागरात बुडल्याने गावावर शोककळा पसरली आहे .

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई