सातारा प्रतिनिधी दौलतराव पिसाळ
संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या निकालाची उत्सुकता मागील काही दिवसा पासून लागलेली असताना.दि.२ रोजी निकाल जाहीर झाला. महाराष्ट्रातील बऱ्याच शाळाचा निकाल समधान कारक लागलेला आहे. त्यातच ओझर्डे ता.वाई येथील पतित पावन विद्या मंदिराचा निकाल देखील ९६ .७७ टक्के लागल्या मुळे ग्रामस्थांनी सर्व शिक्षकांनसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आभार मानुन अभिनंदन केले आहे .
पतित पावन विद्यालयात ऐकुन ३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्या पैकी ३० विद्यार्थी पास झाले तर एक विद्यार्थी दुर्दैवाने नापास झाला आहे .
कु.वैष्णवी दिपक फरांदे हिने ९२ .२० टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला . द्वितीय क्रमांक प्रणव अनील दळवी याने ७९ .२० टक्के गुण मिळविले. तर तृतीय क्रमांक ओम सोपान फरांदे याने ७८ .४० टक्के गुण मिळविले आहेत
या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डि .एम .साळुंखे .सौ.डि.पी.फरांदे एम .ए .मुकादम .एस.बी.आत्तार . नेत्रा सोनावणे .डि .एस .महापूरे .एस.बी.फरांदे .पी.पी.बेलोशे .सचिन माने .सागर पुजारी .या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व शिक्षकांचे संस्थेच्या वतीने तसेच शाळा व्यवस्थापन व विकास समिती सरपंच सर्व सदस्य आणी गावातील ग्रामस्थ व युवकांनी अभिनंदन करुन आभार मानले.
त्याच बरोबर सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई