लोकसंदेश न्यूज सातारा जिल्हा प्रमुख
दौलतराव पिसाळ
आनेवाडी टोल नाक्याच्या पुढे टॅंकरने दिलेल्या धडकेत दोन महिला जागीच ठार .तर एक मुलगी गंभीर जखमी .
बेळगावकडे निघालेल्या टँकरच्या चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने महामार्गालगत वाहनाच्या
प्रतिक्षेत ऊभ्या असलेल्या भारती राजेंद्र कांबळे वय ३५ शारदा कैलास शिर्के वय ६० आणी कु. स्रावणी राजेंद्र कांबळे वय १० तिघेही राहणार पांडे ता.भोर जिल्हा
पुणे या तिघिंनाही टँकरने उडविल्याने या झालेल्या भिषण अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या तर लहान मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारा साठी पुणे येथील ससुन रुग्णालयात दाखल केले आहे .
या गंभीर अपघाताची माहिती आनेवाडी टोल नाक्यावर ड्युटीवर असलेले भुईंज पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सुशांत धुमाळ यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांना दिली घटनेचे गांभीर्य ओळखुन त्यानी आपले सहकारी हवलदार अवघडे जाधव यांना सोबत घेऊन घटना स्थळावर तातडीने दाखल झाले .त्यांनी अपघात स्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेण्याचे आदेश देऊन गंभीर जखमी मुलीला रुग्णवाहिके व्दारे सातारा येथील
शासकीय रुग्णालयात पाठवले .
रमेश गर्जे यांनी या गंभीर घटनेची माहिती डिवाय एसपी बाळासाहेब भालचीम यांना कळवली तेही तातडीने अपघात स्थळावर दाखल होवुन परस्थीतीची पाहणी करून पुढील तपासासाठी सुचना दिल्या आहेत .
याबाबत अपघात स्थळावरून घेतलेली माहिती अशी पुणे बंगलोर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्या जवळ टँकर क्रमांक ( GJ 20 - V - 7473 ) हा पुणे बाजु कडुन सातारा बाजूकडे निघाला असताना टॅंकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गालगत उभ्या असलेल्या दोन महिला व एका मुलीला या टँकरने उडविल्याने या झालेल्या भिषण अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या तर १० वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे .
या अपघाता नंतर महामार्गाचे पोलीस उप निरीक्षक घनवट व इतर महामार्ग पोलिस घटना स्थळावर दाखल झाले होते .
या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपस पोलीस हवालदार अवघडे, पो. ह. जाधव व पो. नाईक धुमाळ करीत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई