लोकसंदेश न्यूज नेटवर्क
महापौर चषक कबड्डी स्पर्धा
पुरुष गटात स्वस्तिक मुंबई उपनगर विजेता तर महिला गटात शिवशक्ती मुंबई ठरली महापौर चषकाची मानकरी: बापुराव चांदोरे पुणे पुरुष गटात उपविजयी तर राजमाता जिजाऊ पुणे संघ महिला संघ उपविजेता: श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते विजेत्या संघांना पारितोषिक:
पुरुष गटात उप उपांत्य म्हणून निर्मल क्रीडा मंडळ औरंगाबाद तर महिलांमध्ये अनिकेत खेड रत्नागिरी तर महिलामध्ये तृतीय क्रमांक महात्मा गांधी उपनगर तर पुरुष गटात इस्लामपूर व्यायाम मंडळ सांगली
तर पुरुष गटात बाबुराव चांदोरे संघाचा सुरेश कडलगेला उत्कृष्ठ चढाई तर निर्मल संघाच्या सुरेश जाधव याला उत्कृष्ट पकड म्हणून सन्मान
महिलांमध्ये उत्कृष्ठ चढाईसाठी अनिकेत खेड संघाच्या सिध्दी चाळके तर राजमाता जिजाऊ संघाची प्रियांका मांगलेकरचा उत्कृष्ठ पकड म्हणून सन्मान:
अष्टपैलू खेळाडू म्हणून महिला मध्ये शिवशक्ती मुंबईच्या रेखा सावंत तर पुरुष गटात स्वस्तिक उपनगर मुंबईचा अकरम शेख म्हणून सन्मान...
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगपालिका आणि राज्य आणि सांगली जिल्हा कब्बडी असोशियनच्या मान्यतेने कुपवाड येथे आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय निमंत्रित महिला आणि पुरुष कब्बडी स्पर्धेत पुरुष गटात स्वस्तिक मुंबई उपनगर विजेता तर महिला गटात शिवशक्ती मुंबई ठरली महापौर चषकाची मानकरी: बापुराव चांदोरे पुणे पुरुष गटात उपविजयी तर राजमाता जिजाऊ पुणे संघ महिला संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आली.
पुरुष गटात उपउपांत्य विजेता म्हणून निर्मल क्रीडा मंडळ औरंगाबाद तर महिलांमध्ये अनिकेत खेड रत्नागिरी तर महिलामध्ये तृतीय क्रमांक महात्मा गांधी उपनगर तर पुरुष गटात इस्लामपूर व्यायाम मंडळ सांगली हा ठरला. पुरुष गटात बाबुराव चांदोरे संघाचा सुरेश कडलगेला उत्कृष्ठ चढाई तर निर्मल संघाच्या सुरेश जाधव याला उत्कृष्ट पकड म्हणून सन्मान करण्यात आला तर महिलांमध्ये उत्कृष्ठ चढाईसाठी अनिकेत खेड संघाच्या सिध्दी चाळके तर राजमाता जिजाऊ संघाची प्रियांका मांगलेकरचा उत्कृष्ठ पकड म्हणून सन्मान करण्यात आला
तर
अष्टपैलू खेळाडू म्हणून महिला मध्ये शिवशक्ती मुंबईच्या रेखा सावंत तर पुरुष गटात स्वस्तिक उपनगर मुंबईचा अकरम शेख या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. महापौर चषक विजेत्या संघांना महापौर रोख 75000 आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले तर अंतिम उपविजयी पुरुष महिला संघाला प्रत्येकी 51000 आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर अन्य सर्व विजेत्यांना खेळाडूंना रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, नगरसेवक विष्णु संतोष पाटील, विजय घाडगे, राजेंद्र कुंभार, शेडजी मोहिते, महिला बालकल्याण समिती सभापती अस्मिता सलगरे, माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका सविता मदने, वर्षा निंबाळकर, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर , माजी नगरसेवक पै. गौतम पवार, राष्ट्रीय खेळाडू गणेश शेट्टी, अशोक शेट्टी, मेजर तीवडे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांच्यासह महापालिकेचे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते , मध्यवर्ती निदान केंद्र समन्वयक काका हलवाई , धनंजय हर्षद, महापालकेचे ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर, सुरेश बंडगर यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण सामन्यांचे संयोजन आणि नियोजन सहायक आयुक्त नितीन काका शिंदे आणि महापालिकेचे क्रीडाधिकारी महेश पाटील यांनी केले. सामन्यांचे समालोचन राष्ट्रीय कब्बडीपटू आणि मनपा घरपट्टी विभागाचे कर्मचारी सुहास व्हटकर यानी केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली