सातारा:लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी.
दौलतराव पिसाळ
"खरीपाचे नियोजन करिता कृषी विभाग पोहचला गावोगावी"
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचेमार्फत मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,सातारा क्षीमती भाग्यश्री फरांदे यांच्या संकल्पनेनुसार मंडल स्तरावर दोन खरीप हंगामपुर्व सभांचे नियोज उनन करावे अशा सुचना होत्या त्यानुसार मेणवली मंङळ मध्ये मौजे धोम ता.वाई येथे मा.तेजदिप ढगे उपविभागीय कृषी अधिकारी वाई यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.त्या कार्यक्रमात श्री.विजय गायकवाड मंडळ कृषी अधिकारी,मेणवली यांनी प्रस्तावीत केले.त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील श्री.भुषण यादगीरवार यांनी भात व सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी,बिजप्रक्रिया या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री.प्रशांत शेंडे तालुका कृषी अधिकारी वाई यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत - फळबाग लागवड, गांडूळ युनिट,नाडेप, महाडीबीटी पोर्टलवरील कृषी विभागाच्या योजना PMFME, PM किसान E KYC, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, पिक विमा योजना, या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी पीक स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या धोम व परिसरातील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास सरपंच, श्री.अविनाश नायकवडी उपसरपंच सौ.शहनाज सय्यद ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेतकरी व महिला वर्ग कृषी पर्यवेक्षक श्री.सोमनाथ पवार व मंडळ मधील सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.विलास पालवी यांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन श्री.प्रदिप देवरे आत्मा BTM यांनी केले.व आभार प्रदर्शन श्री.सचिन पवार यांनी केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई