सातारा प्रतिनिधी
दौलतराव पिसाळ
दी. 2 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त भाजपच्या वतीने विशेष जनसपंर्क अभियान वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात संपूर्ण महिनाभर विविध उपक्रमांनी राबविण्यात येणार असून यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हातातहात घालून काम करणार असल्याची माहिती, माजी आमदार मदन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले - चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, प्रदेश कार्यकारणी सदस्य निखिल झगडे, सचिन घाटगे, रोहिदास पिसाळ, अनिरुद्ध गाढवे, अनिल भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत बोलताना भोसले पुढे म्हणाले, 30 मे रोजी या अभियानास प्रारंभ झाला असून संपर्क से समर्थन या अंतर्गत विधानसभा मतदारसंघातील 50 प्रभावशाली कुटुंबाशी संपर्क साधण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघात विशाल जाहीर सभा घेण्यात येणार आहे. बुद्धिवंतांचे संमेलन, सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तींचा मेळावा, व्यापारी समेलन, विकास तीर्थ, ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत संवाद, संयुक्त मोर्चा संमेलन, लाभार्थी संमेलन, 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग दिनाचे आयोजन, तसेच दी. 23 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 10 बूथवर व्हिडिओ कॉन्फरन्स, तसेच घरोघरी बूथ स्तरीय संपर्क व नऊ वर्षातील कामगिरीची माहिती पत्रके वितरित करण्यात येणार आहेत. भाजप पक्षाच्या वतीने करण्यात आलेली कामे घरोघरी पोचून जनसंपर्क वाढविणे तसेच या माध्यमातून आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारी करन्याय येणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
यावेळी ऋषिकेश धायगुडे, अलंकार सुतार, अतुल पवार, तेजस जमदाडे, यशराज भोसले, सौ. दिपाली पिसाळ, सौ. मनीषा घैसास, नानासो कायंगुडे, मनोज भोसले, सागर जाधव, अजय मांढरे, कुणाल तांबोळी, गौरव जगताप, रवींद्र धायगुडे, अजय धायगुडे, प्रतीक गुरव आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई