. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या लाभासाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या लाभासाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या लाभासाठी
30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करा..

- जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव

सांगली, दि. 2,  : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 30 जून 2023 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे योजनेच्या अटी व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी केले आहे.

जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी करून तीन वर्षे झालेल्या आणि अल्पसंख्याक बहुल जिल्ह्यातील व तालुक्यातील मदरशांना डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून जिल्ह्यातील मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारीक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु या विषयांचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता 9 वी, 10 वी व 12 वी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टिने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेच्या अटी व शर्ती तसेच  अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2600525 येथे संपर्क साधावा.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई