लोकसंदेश न्यूज नेटवर्क
जिल्हा न्यायालयात योग दिन साजरा
सांगली, दि. 21 : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत जिल्हा न्यायालय, विजयनगर येथील आवारात विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील बार असोसिएशन, न्यायालयीन कर्मचारी संघटना, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी योग दिनाचे महत्व उपस्थितांना सांगितले व मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य चांगले ठेवण्याकरीता रोज 1 तास योग व्यायाम केला पाहिजे असे आवाहन केले.
योग शिक्षिका उज्वला सुकुमार चौधरी व सुकुमार चौधरी यांनी योगासनाचे विविध प्रात्याक्षिक प्रकार उपस्थितांना करवून दिले व सर्व उपस्थितांनी याचा लाभ घेतला. यावेळी जिल्हा न्यायाधीश आर. के. मलाबादे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले, मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर, दिवाणी न्यायाधीश एम. एम. राव तसेच सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष किरण रजपूत, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, वकील, न्यायालयीन कर्मचारी यांनी योगासनाच्या विविध प्रकारांचा लाभ घेतला.
सूत्रसंचालन दिवाणी न्यायाधीश डी. आर. देशमुख यांनी केले. आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन न्यायालयाचे प्रबंधक विरूपाक्ष कुलकर्णी, विधी सेवेचे कर्मचारी सचिन नागणे, नितीन आंबेकर, सूरज कदम यांनी केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली