सातारा:
वाईच्या एसटी स्टँडवर ऐन उन्हाळ्यात प्रवासी पिण्याच्या पाण्या पासून वंचित .प्रवाशांन मधुन संतापाची लाट .
वाई प्रतिनिधी दि .१३
वाई एसटी आगार प्रमुखांच्या गलथान कारभारा मुळेच वाईच्या एसटी स्टँडवर ऐन ऊन्हाळ्यातच पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे लहाना पासून थोरांन पर्यंतच्या गोरगरीब जनतेचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहेत .सध्या वाई शहरात
कडक उन्हाचे चटके बसत आहेत . अशा वेळी प्रवासी पाण्याच्या शोधात मोठ्या आशेने पाण्याच्या टाकी पर्यंत पोहचतात पण दुर्दैवाने
तेथील नळ चालु केल्यावर त्याच्यातुन लागलेली ताहन भागविण्या साठी पाणीच ऊपलब्ध न झाल्याने वाई आगाराच्या या गलथान कारभारा विषयी प्रवाशान
मधुन संतापाची लाट उसळली आहे .
वाईच्या एसटी स्टँडवर तालुक्यातील
११७ गावातील डोंगर दर्या खोर्यातुन दररोज हजारो नागरिक आपल्या विविध कामांच्या निमित्ताने एसटीने वाई शहरात येत असतात त्यांनी घरातुन कपड्यात सोबत बांधुन आणलेली कोरभर भाकर ऐन उन्हात एसटीच्या छताखालील सावलीत बसून खातात अशांना २० रुपयांची पदरमोड करुन पाण्याची
बाटली विकत घेण्यासारखी प्रत्येकाची आर्थिक परस्थिती असेलच असे नाही . याची जाणीव त्या वेळचे एसटी कॅन्टीन चालक असलेले दिपक शेठ प्रदिप शेठ गुप्ता आणी वाई शहरातील दानशुर व्यक्ती महत्व असा नाव लौकीक प्राप्त असलेले कै.पोपलाल आणी त्यांचे भावंडांनी एकत्रीत येवुन गोर
गरिब आणी येणार्या जाणार्या प्रवाशांना वाईच्या एसटी स्टँडवर मुबलक पिण्याचे पाणी मिळावे त्यांची पिण्याच्या पाण्या विना हाल
होऊ नयेत हा उदात्त हेतु डोळ्यां समोर ठेवुन स्वखर्चाने एक हजार लिटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधुन त्यात पाणी भरून १९९६ साली त्या वेळच्या आगार प्रमुखांनच्या स्वाधीन
केली होती .त्या वेळी गुप्ता आणी ओसवाल कुटुंबियांनी या टाकीत दररोज स्वच्छ पाणी भरून प्रवाशांची तहान भागवावी अशी विनंती आगार प्रमुखांनसह स्थानक प्रमुखांनाही केली होती .
पण दुर्दैवाने आज ऐन उन्हाळ्याच्या
दिवसातच येथील आगार प्रमुख आणी स्थानक प्रमुखांनच्या गलथान
कारभार मुळे हजारो रुपये खर्च करून बांधलेली पिण्याच्या पाण्याची टाकी हि हजारो
प्रवाशांन समोर पाण्याच्या प्रतिक्षेत
शोपीस म्हणून ऊभी आहे .आज त्या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे . त्या मुळे प्रवाशांन मधुन संतापाची लाट उसळली आहे .
येथील प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यक्षम आगार प्रमुख आणी स्थानक प्रमुखांची नेमणूक करावी अशी मागणी वाई तालुक्यातील जनतेने
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना पाटण येथे दिलेल्या निवेदनात केली आहे .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.