लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
चंद्रकांत गायकवाड
भारत देशाचे महान नेते राजीवजी गांधी
जीव गेला तरी याची मला पर्वा नाही म्हणत आणि देशाच्या ऐक्यासाठी आणि अखंडत्वासाठी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिराजीनी आपले बलिदान दिले. त्यानंतर इंदिराजींच्या बलिदानानंतर संपूर्ण देशामध्ये अस्थिरता येते की काय? अशी भिती सर्वांना वाटू लागू लागली. त्याचवेळी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची म्हणजे A.I.C.C. ची मिटींग तात्काळ दिल्ली मध्ये बोलवणेत आली, त्यामध्ये अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी आपली मते मांडली. त्यामध्ये प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान पदावर दावा केला. त्यावेळी राजीवजी गांधी हे देशांतर्गत दौन्यावर होते तेव्हा काँग्रेस पक्षाचे नेते जनरल सेक्रेटरी डॉ. वसंतदादा पाटील म्हणाले A.I.C.C. मध्ये की बाबानो ही वेळ काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्य पदाच्या वादासाठी निर्माण झालेला आहे. माझे मत असे आहे की, इंदिराजींच्या बलिदानानंतर संपूर्ण देशाला वाहून नेणारा जनमाणसात आपुलकीचे नांव असणारा एकमेव नेता वा घडीला राजीव गांधी आहेत. यावेळी आपण सर्वांनी मिळून एकमुखी पाठींबा राजीवजी गांधी यांना द्यावा अशी सूचना डॉ. वसंतदादा पाटील यांनी A.I.C.C. मध्ये केली.
त्यानुसार मा. प्रणव मुखर्जी यांचे नाव मागे पडले आणि भारत देशाचे युवा पंतप्रधान म्हणून राजीवजी गांधी यांचे नांव पुढे आले आणि राजीवजी गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाला न भूतो न भविष्यती असे दैदिप्यमान यश मिळाले. जवळपास ४२५ खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले व भारतीय जनता पक्षाचे फक्त २ खासदार देशामध्ये निवडून आले.
राजीवजी गांधी पंतप्रधान झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये जशांतता होती. त्यामध्ये पंजाब, जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत वा प्रांतामध्ये अशांतता असताना राजीव गांधी भारत देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी दौरे चालू केले. पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजीव गांधी व लोगोंवाल यांचा करार झाला आणि थोडयाच दिवसात पंजाब शांत झाला. जम्मू काश्मीर मध्ये सुध्दा तिथल्या स्थानिक पक्षाबरोबर करार करून जम्मू काश्मीर शांत केला जाणि ईशान्य भारतामध्ये शांतता प्रस्तापित करण्यासाठी म्हणून राजीव गांधी लालमा यांच्या मध्ये करार झाला आणि ईशान्य भारत शांत झाला. राजीवजी गांधी यांनी संपूर्ण भारतात शांतता प्रस्थापित झाल्यानंतर गरीबांच्या विकासांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांनी विकासाचे पहिले पाऊल उचलले म्हणून भारत देशामध्ये ५०% महिलांना पंचायत समितीच्या माध्यमातून अधिकार दिले. त्यामुळे भारत देशामध्ये पंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद,
नगरपालिका, महानगरपालिका ५०% महिला त्या अध्यक्ष म्हणून वावरू लागल्या. हा क्रांतीकारक निर्णय महिला सबलीकरण कामापोटी राजीवजी गांधी यांनी घेतला. त्यानंतर १८ वर्षावरील युवक व युवतींना मतदानाचा हक्क दिला. त्यानंतर संपूर्ण जगामध्ये तुरन्त टेलिफोन योजना आहे, भारतात नाही म्हणून सॅम पिट्रोडा यांना मदतीला घेऊन भारत देशामध्ये S.T.D., 1.S.D., P.C.O. ही जलद टेलिफोन यंत्रणा देशामध्ये सुरु केली.
भारतामधील शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करण्यासाठी म्हणून शालेय शिक्षणामध्ये कॉम्प्युटराईज शिक्षण दिले पाहिजे ही घोषणा केली. त्यावेळी विरोधी पक्षांनी त्यांना विरोध केला तरीसुध्दा त्यांनी न जुमानता संपूर्ण भारतामध्ये विज्ञान तंत्रज्ञान यांची क्रांती करून दाखविली आणि त्याचा परिणाम भारत देशाने अंतराळात उपग्रह सोडून संपूर्ण यंत्रणा ही आधुनिक केली. त्याचबरोबर नद्याजोड प्रकल्प ,जो पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीमध्ये आणला गेला होता त्याला पृष्टी दिली आणि गंगा प्रदुषणमुक्त करण्याचे काम हाती घेतले.
त्याचबरोबर भारतातील शेतकन्यासाठी शेती जगताला पाणी मिळण्यासाठी म्हणून अनेक जलसिंचन योजना त्यांनी आखल्या जेणेकरून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये भारत हा सधन झाला पाहिजे. आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे म्हणून २१ व्या शतकाकडे वाटचाल करणारा भारत निर्माण करुया अशी त्यांनी हाक दिली. हे करत असताना भारत श्रीलंका येथील सिंहली विरुध्द तामीळ हा वाद श्रीलंकेमध्ये वाद उफाळून आला त्यावेळी राजीव गांधींनी त्यातील तामिया निर्मिती होऊ नये म्हणून श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या विनंतीवरुन एक लाख शांतीसेना म्हणून श्रीलंकेत पाठविले आणि श्रीलंकेमध्ये शांतता प्रस्थापित केली. त्याचबरोबर मॉरिशिस मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून गुलाम होते, त्यांच्या विरोधात बंड झाले तेव्हा राजीव गांधी यांचेकडे मदत मागितली आणि राजीव गांधी यांनी मॉरिशिसमधील बंड उलटून टाकले. संपूर्ण मॉरिशिस शांत झाला.
आंतरराष्ट्रीय पटलावर राजीव गांधी यांचा फार वेगळा दबदबा होता. त्यांनी जेव्हा अमेरिकेमध्ये राष्ट्रकुल परिषद झाली त्यावेळी सिनेट मध्ये भाषण करताना सांगितले संपूर्ण जगाला की, येत्या २१ वर्षामध्ये तीन टप्प्यामध्ये जगातील अण्वस्त्र नष्ट करु या ...ही हाक राजीव गांधी यांनी संपूर्ण जगाला दिली आणि संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. अनेक देशाचे दौरे करत
देशाची प्रतिमा जगामध्ये उंचावली गेली. हे असे कार्य करत असताना भारत देशातील विरोधी पक्षांनी बोफोर्सचा मामला उपस्थित केला आणि राजीवजी गांधी यांचेवर आरोप केले आणि त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. सरते शेवटी सुप्रिम कोटचि आदेशानुसार राजीव गांधीची निर्दोष मुक्तता झाली. १९८९ साली लागलेल्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये विरोधी पक्षांनी देशामध्ये बोफोर्स मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. या निवडणूकीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर दौरे सुरु होते आणि शेवटची सभा तामिळनाडू येथील पेराबंदर येथे शेवटची सभा करण्यासाठी गेले असताना ततपूर्वी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी राजीव गांधी यांचे संरक्षण शिथील केले होते.
त्यामुळे शेवटच्या सभेमध्ये तामीळनाडूची एक महिला स्वतःच्या अंगाभोवती बॉम्ब लपेटून आली आणि तिने राजीव गांधी यांना वाकून नमस्कार करण्याचा बहाणा केला आणि बॉम्बचे बटण दाबले. राजीव गांधी यांचा संपूर्ण देह त्यांचे रक्त या भारत भूमीवर विखुरले गेले आणि तामीळनाडूची निर्मिती होऊ नये म्हणून राजीवजी गांधी यांनी आपले बलिदान दिले.
२१ मे १९९१ हा दिवस काळा दिन म्हणून जगामध्ये एका स्त्री करवी अंगाला बॉम्ब लपेटून केलेली ही पहिली हत्या होती.
अशा या महान नेत्याला तमाम भारतवासीयांचा सलाम.
॥ जयहिंद ।।
॥ जय भारत ॥
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली